Wednesday, July 3, 2024

Sidhu Moosewala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आईने दिली गुड न्यूज; ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moosewala) २०२२ मध्ये हत्या झाली होती. त्याच्या हत्येनंतर समाजातील वातावरण चांगलेचं तापलं होतं. या घटनेला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, त्याच्या आईवडिलांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईने गुड न्यूज दिली आहे. लवकरच त्या बाळाला जन्म देणार आहेत. मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी बातमीला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर या पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार आहेत. आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बाळाचे माता पिता होणार आहेत. तर दुसरीकडे सिद्धू मूसेवालाच्या काकांनी आम्ही देवाचे आभारी आहोत की कारण आमच्या घरात नवीन आनंद येणार आहे. अशी भावना व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

गेल्या काही दिवसांपासून सिद्धू मूसेवालाच्या आई-वडिलांनी सिद्धूच्या चाहत्यांना भेटणं टाळलं होतं. दर रविवारी ते चाहत्यांची भेट घ्यायचे. पण आता ते सार्वजनिक ठिकाणी फारसे बाहेर पडलेले नाहीत.

सिद्धू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. २९ मे २०२२ रोजी त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा तो २९ वर्षांचा होता. अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर सगळीकडेच तणावाचं वातावरण होतं. त्याच्या आईवडिलांनाही लेकाच्या हत्येनंतर जबर धक्का बसला होता.

हे देखील वाचा