Tuesday, July 9, 2024

गायक सिद्धू मुसेवालाचं नाही, तर मनोरंजन जगतातील ‘या’ दिग्गजांचीही करण्यात आलीय निर्घृण हत्या

पैसा, प्रसिद्धी मिळवण्याच सर्वात मोठे क्षेत्र म्हणून सिनेमा जगत आणि मनोरंजन जगताचे नाव घेतले जाते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना या जगतात प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागते. याचेच उदाहरण म्हणजे नुकतीच पंजाबी गायक सिध्दु मूसेवालाची झालेली निर्घुण हत्या करण्यात आली.  या हत्येच्या बातमीने देशभरातील मनोरंजन जगतात खळबळ माजली आहे. पण अशा प्रकारे हत्येचे प्रकार सिनेमाजगतात नवे नाहीत. याआधीही अशाच प्रकारे अनेक कलाकारांची हत्या झाली आहे. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.

सिद्धू मूसावाला- पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसावाला यांची रविवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बातम्यांनुसार, जुन्या वैमनस्यामुळे ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्येत कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रारचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, पोलीस अजूनही तपासात गुंतले आहेत. त्याचे शेवटचे गाणे होते ‘द लास्ट राइड’, ज्यामध्ये 295 नंबर वापरण्यात आला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या हत्येची तारीख देखील 29/5 आहे.

गुलशन कुमार – 26 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलीवूड आणि टी-सीरीजचे मालक आणि गायक गुलशन कुमार यांच्यावरही गोळ्यांचा पाऊस पडला होता, ज्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्यावर 16 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या हत्येपूर्वी काही काळ मुंबईचा डॉन सालेम त्यांच्याकडे सतत 10 कोटी रुपयांची खंडणी मागत होता, मात्र त्यांनी देण्यास नकार दिल्याने त्यांची शिव मंदिरासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती.

क्रिस्टीना ग्रिमी – हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका क्रिस्टीना ग्रिमीला वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी मृत्यूला सामोरे जावे लागले. असे म्हटले जाते की, 2016 मध्ये क्रिस्टीना फ्लोरिडामध्ये तिच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देत होती. त्याचवेळी केविन नावाच्या व्यक्तीने तिच्या गोळ्या झाडून तिची हत्या केली.

फिल हार्टमन – कॅनडाचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि स्क्रीन प्ले लेखक फिल हार्टमन यांचाही गोळीबारात मृत्यू झाला. बातम्यांनुसार, 1998 मध्ये फिलचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते, ज्यामुळे फिलच्या पत्नीने त्याच्यावर तीन वेळा गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मार्विन गे- हॉलिवूड गायक मार्विन गे याची त्याच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली होती. असे म्हटले जाते की त्याला त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट घ्यायचा होता, जो त्याच्या वडिलांना मान्य नव्हता, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा