Saturday, June 29, 2024

‘एक अपुरे गाणे, एक अपुरी कहाणी’; ‘अधुरा’चे पोस्टर रिलीझ, शेवटचे दिसणार एकत्र ‘सिडनाझ’

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची माहिती समोर आली, तेव्हा सगळेच स्तब्ध झाले होते. एक चमकणारा तारा अशाप्रकारे अदृश्य होईल, यावर कोणीही विश्वास ठेवू शकला नाही. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहते पुर्णपणे तुटले आहेत. दरम्यान आता अशी एक माहिती समोर आली आहे, जी सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. सिद्धार्थ शुक्लाचा शेवटचे व्हिडिओ सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत शहनाझ गिल दिसणार आहे.

खरं तर, जगाला निरोप देण्यापूर्वी सिद्धार्थ शहनाझसोबत ‘हॅबिट’ या म्युझिक व्हिडिओवर काम करत होता, जो अभिनेत्याच्या निधनानंतर अपूर्ण राहिला. असे सांगितले जात आहे की, आता गाण्याच्या निर्मात्यांनी शीर्षक बदलून ते प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली आहे. आता या गाण्याचे नाव बदलून ‘अधुरा’ करण्यात आले आहे. त्याचबरोबर याचे एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, “एक अपूर्ण गाणे, एक अपूर्ण कथा, एक सिडनाझ सॉंग.” हे गाणे आर्कोने लिहिले आहे, ज्याला श्रेया घोषालने तिचा आवाज दिला आहे.

गाण्याची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण या बातमीमुळे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. शेवटच्या वेळी शहनाझ आणि सिद्धार्थला एकत्र पाहणे त्यांच्यासाठी एखाद्या ट्रिटपेक्षा कमी नसेल. उल्लेखनीय म्हणजे, शहनाझ गिलचा ‘हौसला रख’ हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शहनाझसोबत दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस १३’चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या घरात त्याची शहनाझ गिलसोबत जोडी होती, जी चाहत्यांना खूप आवडली. शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले, तेव्हा सिडनाझ अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

-सिद्धार्थ गेल्यानंतर भावनिक गाणं गाताना दिसली शेहनाझ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही अनावर होतील अश्रू

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

हे देखील वाचा