Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड ” बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ.. सलमानला घरात घुसून मारू” !! सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

” बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ.. सलमानला घरात घुसून मारू” !! सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्याला त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली आहे. या घटनेनंतर वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. संदेश कुठे आणि कसा पाठवला गेला? त्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर मेसेज आल्यानंतर वरिष्ठांना माहिती देण्यात आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अलिकडच्या काळात वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनला अभिनेत्याला लक्ष्य करणारे अनेक धमकीचे संदेश मिळाले आहेत.

सलमान खानने त्याच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याबद्दल ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पहिल्यांदाच आपले मौन सोडले. त्याला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत त्याने म्हटले होते की सुरक्षा वाढवल्यानंतर त्याला त्याच्या हालचाली कमी कराव्या लागल्या. सलमान खान म्हणाला की, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला त्याच्या दैनंदिन कामात अडचणी येतात. तो म्हणाला, ‘मी सुरक्षेबाबत काहीही करू शकत नाही.’ शूटिंग दरम्यान, मी गॅलेक्सीहून शूटिंगसाठी जायचो आणि शूटिंगवरून गॅलेक्सीला परत यायचो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

मेघना गुलजार यांच्या आगामी ” दायरा” या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत.…

हे देखील वाचा