Friday, July 5, 2024

सिमी ग्रेवालला करायचे होते सैफ अली खानच्या वडिलांशी लग्न, ‘या’ शोमुळे आली प्रसिद्धीच्या झोतात

अभिनेत्री सिमी गरेवालबद्दल तिच्या लोकप्रिय टॉक शो ‘रोनदेवू विथ सिमी ग्रेवाल’ साठी ओळखली जाते. सिमीचा जन्म १९४७ मध्ये लुधियानामध्ये झाला होता, असे म्हटले जाते की त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र, सिमीच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, तिने आधी खूप शिकावे. त्यामुळेच सिमीच्या कुटुंबीयांनी तिला आणि तिच्या बहिणीला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवले. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिमी ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्र पटात दिसली. या चित्रपटात सिमीच्या विरुद्ध फिरोज खान दिसला होता.

मात्र, १९६५ साली आलेला ‘तीन देवियां’ हा चित्रपट सिमीच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला, या चित्रपटात देव आनंद मुख्य भूमिकेत होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इंडस्ट्रीतील लोक सिमीला ओळखू लागले. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सिमी ग्रेवाल एकेकाळी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडीच्या खूप जवळ होती.

दोघांची जवळीक पाहून ते लवकरच लग्न करणार असल्याचे समजले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. सिमीने नंतर दिल्लीस्थित उद्योगपती रवी मोहनशी लग्न केले. मात्र, हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.

आम्ही तुम्हाला सांगतो की सिमीला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लोकप्रिय चॅट शो ‘रोनदेवू विथ सिमी ग्रेवाल’ मधून ओळख मिळाली. सिमीने चित्रपट निर्माता राज कपूर आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक डॉक्युमेंट्री फिल्मही बनवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा