Friday, July 5, 2024

‘इंडियन आयडल’ संपताच आदित्य नारायण सुट्टीसाठी पोहोचला मालदीवला; पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर

टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘इंडियन आयडल’चे बारावे पर्व नुकतेच पार पडले. यामध्ये पवनदीपने बाजी मारली. या शोचे सूत्रसंचालन आदित्य नारायणने केले होते. इंडियन आयडलचे बारावे पर्व संपल्यानंतर तो आता आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यासाठी तो आपली पत्नी श्वेता अग्रवालबरोबर मालदीवला गेला आहे.

आदित्य व श्वेता अग्रवाल हे दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत होते. ‘शापित’ चित्रपटादरम्यान त्या दोघांची एकमेकांबरोबर ओळख झाली होती. हा चित्रपट तर रुपेरी पडद्यावर फार चालला नाही. परंतु या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. डिसेंबर २०२० मध्ये या दोघांनी विवाह केला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू होती. आता ते दोघे मालदीवला एकत्र आपल्या सुट्ट्या घालवत आहेत. (Singer Aditya Narayan Heads To Maldives With Wife Vacation After Indian Idol Ends)

या दोघांनी त्यांचे सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या या फोटोंना देखील चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालदीवला जाताना विमानतळ आणि विमानातील फोटो त्यांनी शेअर केले होते. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करत त्यांनी प्रवास केल्याचे पाहायला मिळत होते.

मालदीवला पोहोचल्यानंतर त्यांनी सनसियामया रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. आदित्यने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याची माहिती दिली. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता तेथील वातावरण किती सुंदर आहे.

त्यानंतर आदित्यने त्याचा बाथरोबमधील एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो त्याच्या पत्नीसह तेथील निसर्गाची किमया अनुभवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत आदित्यने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर अशा ठिकाणी आयुष्यभराच्या नवीन आठवणी बनवण्याची मज्जा काही औरच आहे.”

मालदीवला त्याने पत्नी श्वेताबरोबर समुद्रकिनारी जेवणाचा आस्वाद देखील घेतला. त्याने आपल्या रोमँटिक डिनरचे फोटोदेखील शेअर केले आहेत. यामध्ये दोघांचे प्रेम अगदी खुलून दिसत आहे. यावेळी दोघांनी कॅज्युअल कपडे परिधान केले आहेत.

या फोटोमध्ये श्वेता रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर विश्रांती घेताना दिसत आहे. या जोडप्याने मालदीवमधील सर्व फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी लाल हार्टचे इमोजी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

आदित्यने आपल्या करिअरची सुरुवात ‘सारेगामापा’ या शोमधून केली होती. सुट्टी संपल्यावर तो ‘इंडियन आयडल’नंतर आता पुन्हा ‘सारेगामापा’मध्ये सूत्रसंचालन करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा