Thursday, July 18, 2024

बाबाे! इंडियन आयडलचा पर्दाफाश करणारा गायकच कार्यक्रमात पाहुणा म्हणुन उपस्थित

टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडल यावर टीका करणारा गायक अमित कुमार वर्षभरानंतर शोमध्ये परतत आहे. होय, रिऍलिटी शोला खूप काही बाेलुनही शोच्या आयोजकांनी दिग्गज पार्श्वगायकाला परत आणण्यात यश मिळवले आहे. वडील किशोर कुमार यांना समर्पित एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून अमित कुमार उपस्थित राहणार आहेत.

अमितने गायले गाणं आणि साेबतच शेअर केला किस्सा
इंडियन आयडलचे प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीने गुरुवारी (दि. 27 ऑक्टाेबर)ला संध्याकाळी आगामी भागाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये पार्श्वगायक अमित कुमार (amit kumar) शोच्या सेटवर आल्याचे दाखवले आहे आणि त्यानंतर स्पर्धक किशोर कुमार (kishor kumar) यांची काही अविस्मरणीय गाणी गाताना दिसत आहेत. बिदिप्ताच्या परफॉर्मन्सनंतर, अमितने तेजाब चित्रपटामधील स्वतःचे ‘कह दो की तुम…’ हे गाणं गायले. यासाेबतच अमितने गाण्याबद्दलचा एक किस्साही शेअर केला आहे.

अमितने स्पर्धकांच्या टॅलेंटवर उपस्थित केले हाेते प्रश्न
इंडियन आयडॉल शोमध्ये अमित कुमार सहभागी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. कारण यापुर्वी पार्श्वगायकाने या टीव्ही शोवर जोरदार टीका केली होती. त्यांनी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या टॅलेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. त्यावेळी या शोची बरीच चर्चा झाली होती. मात्र, शोच्या आयोजकांनी बहुधा अमित कुमार यांच्यासोबत ते प्रकरण सोडवले आहे. त्यामुळे तो लवकरच या शोमध्ये पाहुणा म्हणून येणार आहे.

काेण आहे अमित कुमार?
किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार हा एक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. 1970 ते 90 च्या दशकात त्यांनी अनेक सुपर डुपर हिट गाणी इंडस्ट्रीला दिली. त्यामध्ये ‘बोल चुडिया’, ‘बडे अच्छे लगते है’ या दमदार गाण्याचा समावेश आहे. मात्र, नंतर थेट परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी पार्श्वगायन सोडले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कांतारा का अडकलाय वादाच्या भोवऱ्यात? जाणून घ्या एका क्लीकवर

रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपटगृहांमध्ये घालतोय धुमाकूळ, 4 नोव्हेंबरला होणार ओटीटीवर रिलीज?

हे देखील वाचा