Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर! अरिजित सिंगच्या आईचे निधन, कोरोनाने घेतला जीव

गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर! अरिजित सिंगच्या आईचे निधन, कोरोनाने घेतला जीव

बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक अरिजित सिंगवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरिजितच्या आईचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. त्यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे गुरुवारी (२० मे) जवळपास ११ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांची तब्येत आधीपासूनच नाजूक असल्याचे सांगितले जात होते. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. अरिजितच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी सर्वप्रथम अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी आणि चित्रपट निर्माते श्रीजीत मुखर्जी यांनी दिली होती. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अरिजितच्या आईसाठी ए निगेटिव्ह रक्ताची मागणीही केली होती.

त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती की, “अरिजित सिंगच्या आईला ए निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे. त्या एएमआरआय धाकुरिया रुग्णालयात दाखल आहेत आणि याची आजच गरज आहे.” त्यांची ही पोस्ट आता हटवण्यात आली आहे.

अरिजित सिंगची आई रोज कोरोनाशी झुंज देत होती, परंतु त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांही अरिजितच्या आईला वाचवू शकले नाहीत. असे म्हटले जात आहे की, काही दिवसांपासून त्या एकमो (ECMO)वर होत्या आणि त्यांची स्थिती खूपच गंभीर होती.

आपला देश आजही कोरोनाविरुद्ध लढत आहे. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये कलाकारांचाही समावेश आहे. अशामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार पुढे येऊन मदत करत आहेत. यासोबतच ते चाहत्यांना मास्क लावण्याचे आणि अधिकाधिक घरातच बसण्याचे आवाहन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी पटत नाही’, कोरोना काळात मदत कर म्हणणाऱ्या युजरला सोनालीने शिकवला धडा

-अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या सुखी संसाराला ३७ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस!

-‘तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवलंय’, सोनू सूदने केली सीएसकेच्या ‘या’ खेळाडूची प्रशंसा

हे देखील वाचा