Tuesday, March 5, 2024

‘हा’ लोकप्रिय गायक झाला बाबा, सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि मूळचा पाकिस्तानी असणारा आतिफ अस्लम सध्या चांगलाच गाजत आहे. नुकताच आतिफला जगातील सर्वात मोठा आनंद लाभला आहे. नुकताच तो बाबा झाला आहे. त्याला आणि त्याची पत्नी असलेल्या साराला कन्यारत्नाची प्राप्ती झाली असून हे त्यांचे तिसरे मूल आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात त्याला मुलगी झाल्याने तो खूपच जास्त आनंदात असून, त्याने त्याच्या आनंद आणि बाबा झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोबतच बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atif Aslam (@atifaslam)

आतिफ अस्लमला २३ मार्च रोजी मुलगी झाली आहे. त्याने या आनंदच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टसोबतच बाळाचा फोटो आणि बाळाचे नाव देखील जाहीर केले आहे. अतिफने त्याच्यापोस्टमध्ये लिहिले, “प्रतीक्षा संपली! माझ्या हृदयाच्या नवीन राणीचे आमच्या आयुष्यात आगमन झाले आहे. बाळ आणि आई दोघेही सुखरुप असून, हलिमा आतिफ अस्लमकडून रमजानच्या शुभेच्छा”, आतिफच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आतिफ अस्लमने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा त्याने दाखवला नाही. दरम्यान आतिफ अस्लम आणि सारा भरवानी यांनी २९ मार्च २०१३ रोजी पाकिस्तानच्या लाहोर येथे लग्न केले, तो नेहमीच त्याच्या पत्नीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. आतिफ आणि सारा यांना अब्दुल आणि आर्यन ही दोन मुलं असून, आता एक मुलगी झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा