बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिक संगीतकार बप्पी लहरी यांच्याबाबत अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईमधील एका रुग्णालयात शेवटाचा श्वास घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बप्पी यांचे निधन मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी रात्री ११ च्या आसपास झाले आहे. ते मागील अनेक दिवसापासून आजादी होते. त्यांचा इलाज क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये होत होता.
बप्पी (Bappi lahiri) हे संगीत क्षेत्रातील एक गाजलेले नाव आहे. या व्यतिरिक्त त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांच्या अंगावरील सोने. त्यांना सोने खूप आवडते होते. ते जिथे कुठे जातील तिथे सोने घालून जात असे. याचे कारण की, त्यांना ते त्यांचे लक वाटते होते. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तसेच त्यांनी अनेक रिऍलिटी शोचे परीक्षण देखील केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने विविध क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
संगीत क्षेत्रात एकानंतर एक मोठे धक्के येत आहेत. बप्पी लहरीआधी गान कोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. यानंतर मंगळवारी (१५ फेब्रुवारी) बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे देखील निधन झाले. त्यामुळे संगीत क्षेत्रात सध्या दुःखाचे सावट पसरले आहे. ( Singer bappi Lahiri no more, brathes his last in Mumbai hospital)
बप्पी लहरी यांनी ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परंतु ८० च्या दशकात आल्यावर ते नावारूपाला आहे. त्यांना खरी ओळख १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘जख्मी’ या चित्रपटातून मिळाली.
त्यांनी ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘आय एम ए डिस्को डान्सर’, ‘जूबी जूबी’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’, ‘यार बिना चैन कहा रे’, यांसारखी गाणी गायली आहेत.
काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, त्यांचा आवाज गेला आहे. परंतु या सगळ्या अफवा होत्या. त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता की, ते ठीक आहेत आणि त्यांचा आवाज देखील एकदम नीट आहे.