संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. सामान्य व्यक्ती तर सोडाच बॉलिवूडच्या बड्या दिग्गज कलाकारांनाही कोरोनाचा दणका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेेता कार्तिक आर्यन, आमिर खान, आर माधवन, संजय लीला भन्साळी, फातिमा सना शेख यांसारखे कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर आता दिग्गज गायक बप्पी लहिरीदेखील कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बप्पी लहिरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
गायक बप्पी लहिरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, बप्पी यांच्या प्रवक्त्याने म्हटले की, “बप्पी दा यांनी खूप काळजी घेतली, परंतु तरीही त्यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे मिळाली आहेत. आपल्या वाढत्या वयामुळे ते मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते लवकरच बरे होऊन घरी परततील.”
प्रार्थनेची आवश्यकता
प्रवक्त्याने पुढे म्हटले की, “त्यांना नेहमीच आपल्या प्रार्थनांमध्ये ठेवण्यासाठी धन्यवाद. त्यांना भारत आणि परदेशातील आपले चाहते, मित्र आणि प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेची आवश्यकता आहे. बप्पी दा यांच्याकडून हा संदेश आम्ही त्यांच्या चाहत्यांना देऊ इच्छितो की ते ठीक आहेत.”
केले होते वॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन
त्यांनी १७ मार्च रोजी याची माहिती दिली होती की, त्यांना कोव्हिड-१९ साठी वॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. तरीही, याबाबत ही माहिती मिळाली नाही की, त्यांनी कोव्हिड वॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे की नाही.
अधिक वय झाले असूनही आहेत सक्रिय
विशेष म्हणजे अधिक वय झाले असूनही ते खूप सक्रिय आहेत. ते केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही, तर सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
बप्पी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या पोस्ट करत असतात, जे चाहत्यांना खूपच आवडतात.
प्रसिद्ध गाणी
बप्पी लहिरी यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यातील त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘याद आ रहा है’, ‘ऊ ला ला’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘अरे प्यार कर ले’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया