दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा आणि तिचा पती अभिनेता राहुल रविंंद्रन यांच्या घरी पाळणा हलला आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, या जोडप्यांना जुळ्या मुलांचे सौभाग्य लाभले. आता ते एकसोबतच दोन मुलांचे आई-वडील बनले आहेत. या गोड बातमीनंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी ही बातमी सोशल मीडियावरून देताच चाहत्यांनाही भलताच आनंद झाला आहे. तसेच, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जोडप्याने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
या जोडप्याने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. त्यांनी आपल्या लहान मुलाचे बोट हातात घेऊन फोटो शेअर केला आहे. या जुळ्या मुलांमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. चाहत्यांना ही आनंदाची बातमी देण्यासोबतच चिन्मयी श्रीपदा (Chinmayi Sripaada) हिने आपल्या दोन्ही मुलांच्या नावाचाही खुलासा केला आहे. मुलीचे नाव द्रिप्ता (Driptah), तर मुलाचे नाव श्रावस (Shravas) असे ठेवले आहे.
View this post on Instagram
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत चिन्मयी आणि राहुल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात रोमँटिक आणि गोंडस जोडप्यांमध्ये चिन्मयी आणि राहुलची गणना होते. २०१४ मध्ये चिन्मयी आणि राहुलचे लग्न झाले. लग्नाच्या तब्बल ८ वर्षानंतर दोघांनाही आयुष्यात इतका मोठा आनंद झाला आहे. आयुष्याचा हा नवा अध्याय सुरू करताना हे जोडपे खूप आनंदी आहे. चाहतेही या जोडप्याचे खूप अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
गायिका चिन्मयीने प्रेग्नंसीदरम्यान आपल्या बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले नव्हते. तिने प्रेग्नंसीबाबतही कोणालाच माहिती दिली नव्हती. अशात या जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतरच ही आनंदाची बातमी सांगताच, चाहते जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले की, जोडप्यांच्या मुलांचा जन्म सरोगसीमार्फत तर झाला नाही.
मात्र, गायिकेने या सर्व बातम्यांना पूर्णविराम लावत सांगितले की, त्यांनी आपल्या प्रेग्नंसीबाबत फक्त आपल्या जवळच्या लोकांनाच सांगितले होते. तिने असेही सांगितले की, ती तिचे वैयक्तिक आयुष्य, कुटुंब आणि मित्रमंडळींबाबत खूपच काळजी घेते. तसेच, पुढेही घेत राहील.
चिन्मयीची प्रसिद्ध गाणी
चिन्मयीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच मराठी आणि बॉलिवूडमधील सिनेमांच्या गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे. तिने ‘मस्त मगन’, ‘तितली’, ‘मैं रंग शरबतों का’, ‘सैराट झालं जी’, ‘जेहनसीब’, ‘येंती येंती’ अशा विविध भाषेतील गाण्यांचाही समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-