Tuesday, July 9, 2024

प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांनी इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे सांगितले धक्कादायक कारण, एकदा वाचाच

‘मैने पायल जो छनकाई’, ‘मेरी चुनर उड उड जाये’ आणि ‘याद पिया की आने लगी’ ही गाणी एकताच एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक. संगीताच्या विश्वातील नावाजलेले नाव. विशेष म्हणजे त्यांचे भक्तिगीते  आणि दांडिया स्पेशल गाणे लोकप्रिय राहिले आहेत. एकेकाळी त्यांनी त्यांच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, गायिका  फाल्गुनी पाठक या इंडस्ट्रीपासून दूर का गेल्या? चला तर मग या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ या…
53 वर्षीय प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) आजही त्यांच्या ‘मैने पायल जो छनकाई’ आणि ‘याद पिया की आने लगी’ या गाण्यांसाठी ओळखली जातात. 1998 ते 2002 पर्यंत त्यांच्या गाण्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. त्या काळात त्या खूप प्रसिद्ध गायिका होत्या. इतकेच नाही तर त्यांची गाणी रिलीज होताच इतकी लोकप्रिय व्हायची की लोक त्यांची नवीन गाणी येण्याची वाट पाहायची.
त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला. ज्या निर्णयामुळे त्यांचे करिअरचा ग्राफ घसरला. स्वतःच्या अटींवर काम करायचे ठरवल्यावर त्यांचे करिअर अचानक अधोगतीकडे वाटचाल करू लागलं. 1998 मध्ये जेव्हा त्यांचा पहिला म्युझिक अल्बम ‘याद पिया की आने लगी’ आला, तेव्हा या अल्बमने लोकांमध्ये खळबळ माजवली होती. त्यांच्या पहिल्याच अल्बममधून मिळालेल्या जबरदस्त यशाने त्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1999 मध्ये त्यांचा ‘मैने पायल है छनकाई’ नावाचा दुसरा अल्बम रिलीज झाला.
फाल्गुनी पाठक यांच्या दुसऱ्या अल्बमलाही चांगला प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे गायिकेच्या अल्बमने जगात एक जबरदस्त ओळख निर्माण केली. त्या काळात त्यांची गाणी लग्नापासून ते कोणत्याही पार्टीपर्यंत सगळीकडे ऐकायला मिळत होती, पण या काळात त्यांची एक चूक झाली आणि अचानक त्याची करिअर घसरत चालले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्यांचा पहिला अल्बम हिट झाला, तेव्हापासून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटात गाण्यासाठी ऑफर दिली होती. फाल्गुनीने त्या सर्व ऑफर्स नाकारल्या.
गायिकेच्या एका जिद्दीमुळे करिअरचे बरेच नुकसान झाले. खरं तर, त्यांना चित्रपटात गाण्याची इच्छा नव्हती, एका मुलाखतीत, जेव्हा गायिकेला विचारले गेले की, त्या वर्षानुवर्षे लो प्रोफाइल का ठेवत आहे, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हा माझा स्वभाव आहे. मी वर्षभर शो करते, पण मी तितकी मीडिया जाणकार नाही. मी नेहमी अशीच होते.’

त्याच्या याच मुलाखतीत त्यांनी हे देखील उघड केले की, बॉलीवूड चित्रपटांमध्ये गाण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या असल्या तरी त्या स्वीकारण्याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. त्या म्हणाल्या, ‘मी बॉलिवूडला कधीच गांभीर्याने घेतले नाही. मला ऑफर्स आल्या, पण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागते. माझे शो आणि अल्बम करण्यात मला आनंद झाला.’ (singer-falguni-pathak-graba-queen-of-music-world-why-did-not-accept-music-offer-in-movie)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये
‘हिंमत नाही पाय मोडला आहे’ अस म्हणत दिग्गज गीतकार यांनी सांगितला जीवनातील संघर्ष; एकदा वाचाच

हे देखील वाचा