Wednesday, July 2, 2025
Home अन्य हार्डी संधू झाला ऊप्स मुव्हमेंटचा शिकार; सेटवर शूटिंग दरम्यान खाली घसरली पँट, व्हिडिओ झाला व्हायरल

हार्डी संधू झाला ऊप्स मुव्हमेंटचा शिकार; सेटवर शूटिंग दरम्यान खाली घसरली पँट, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमध्ये अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून ऊप्स मुव्हमेंटचा सामना करावा लागतो. त्यांच्या कपड्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी मीडियासमोर त्यांना मान खाली घालावी लागते. अशा प्रसंगांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र खूपच कमी वेळा असे घडते की, अभिनेत्यांना अशा ऊप्स मुव्हमेंटचा सामना करावा लागतो. असेच काहीसे घडले आहे. प्रसिद्ध गायक हार्डी संधूसोबत (Harrdy Sandhu). हार्डीच्या ऊप्स मुव्हमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे.

हार्डी सिंधूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओवर मीडियामध्ये तुफान बज निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हार्डी आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक एका गाण्याचे शूटिंग करता आहे. डान्स करता करता पँट सर्व क्रूमधील लोकांसमोर खाली आली. व्हिडिओमध्ये दिसते की, गाण्यातील एका डान्सच्या सीनचे शूटिंग चालू असताना अचानक हार्डीची पँट खाली येते आणि तिथे हजर असलेले सर्व लोकं जोरजोरात हसायला लागतात. सेटवर मुली जास्त असल्याने पँट खाली आल्यानंतर हार्डीची खूपच लाजिरवाणी अवस्था झाली होती. मात्र लगेच त्याने सावरत अशा खाली आलेल्या पँटमधेच डान्स करायला सुरुवात केली. मुख्य बाब म्हणजे खाली आलेल्या पँट खाली त्याने अजून एक पँट घातली असल्याने त्याची इज्जत वाचली. या व्हिडिओवर कमेंट करताना पलक तिवारीने लिहिले, “हे मी खरंच कसे विसरले.”

पंजाबमधील तुफान लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक म्हणून हार्डी संधूची ओळख आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटात त्याचे अमाप फॅन फॉलोविंग आहेत. हार्डीच्या प्रत्येक गाण्यासाठी त्याचे फॅन्स वेडे असतात. त्याचे नवीन गाणे आले की लगेच ते ट्रेंडिंगमध्ये येते आणि लोकप्रिय होते. हार्डीचे असे एकही गाणे नाही जे हिट झाले नाही. नुकतेच त्याचे ‘बिजली बिजली’गाणे प्रदर्शित झाले होते, जे तुफान गाजले. या गाण्याचे सोशल मीडियावर अनेक रिल्स आणि व्हिडिओ तयार झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा