Thursday, November 30, 2023

धमाका! खेसारी लाल यादवच्या ‘छठ घाटे चली’ गाण्यानं घातली धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठ सारखे सण आता जवळ आले आहेत. लोक खरेदीसह हे सण खास पद्धतीने साजरे करण्याच्या उत्साहात आहेत. अशा वातावरणात दिवाळीची फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईने बाजारपेठा गजबजून गेल्याचे पाहायला मिळत असतानाच नद्यांच्या घाटांवर छठपूजेची व्यवस्था केली जात आहे. दिवाळी हा सण देश-विदेशात साजरा केला जातो, तर भारतातील काही राज्यांमध्ये छटी मैया हा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा एखादा खास प्रसंग असावा आणि त्यात भाेजपूरी सिनेमांचा सहभाग नसावा असे हाेऊ शकते का?

आजकाल भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स छठ मैयाच्या सण साजरा करण्यात मग्न आहेत आणि दररोज स्वतःचे संगीत व्हिडिओ रिलीज करत आहेत. त्याचबरोबर अनेक जुनी गाणी देखील खूप पसंत केली जात आहेत. अशातच खेसारी लाल यादव (khesari lal yadav) यांच ‘छठ घाटे चली’ (Chhath Ghate Chali) गाणं चर्चेत आले आहे. या गाण्याचे बोल अखिलेश कश्यप यांनी लिहिले असून संगीत श्याम सुंदर यांनी दिले आहे. हे गाणे आदिशक्ती फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर नोव्हेंबर 2020 मध्ये आले असले तरी भोजपुरी गाणे प्रेमींना ते कायमच पहायला आणि ऐकायला आवडते. बिहार-झारखंडमध्ये छठ उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लाखो लोकांची गर्दी जमते आणि लोकांचा उत्साह शिगेला पाेहचताे.

यावर्षीच्या छठ पूजेदरम्यान, खेसरीलाल देखील त्यांच्या चाहत्यांना एक नवीन भेट देणार आहेत. या मोठ्या सणाच्या दरम्यान, अभिनेत्याचा आगामी ‘बोल राधा बोल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यातच त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिनेता आणि मेघश्रीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. अभिनेता हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. नुकतेच खेसारी लाल यादव यांनीही बोल राधा बोल या चित्रपटासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला असून एका वेगळ्या संकल्पनेवरचा एक उत्तम चित्रपट घेऊन येत असल्याचे सांगितले आहे. याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या असेही मागणी त्यांनी केली आहे. हा चित्रपट छठ पूजेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. रेणू विजय फिल्म्स एंटरटेनमेंटचे निशांत उज्ज्वल हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करत आहेत. कुलदीप श्रीवास्तव आणि श्रद्धा विजय यादव यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित… आजवर १४ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात वाजला डंका

रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती

हे देखील वाचा