Friday, July 5, 2024

गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण; चाहत्यांना आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे केले आवाहन

ज्येष्ठ गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समजले आहे. त्यांच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुमार सानू आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत जाण्यासाठी निघाले होते, परंतु आता त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करावा लागला आहे.

कुमार सानू यांनी आपल्या फेसबुक पेज वर लिहून या गोष्टीची पुष्टी केली, त्यात असे लिहिले आहे की “दुर्दैवाने सानुदांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.” सध्या सानूदा क्वारंटाईन (विलग्नवास) मध्ये आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, सानूदा आपला वाढदिवस २० ऑक्टोबर रोजी पत्नी सलोनी आणि मुली शॅनन आणि अ‍ॅनाबेलसमवेत घालवण्यास उत्सुक होते. बॉम्बे टाईम्सशी बोलताना त्यांच्या पत्नी सलोनी म्हणाल्या, “जर ते ८ नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे बरे झाले तर ते अमेरिकेला येतील. सध्या ते अनिवार्य क्वारंटाईन मध्ये आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून ते आम्हाला भेटायला आतुर आहेत. जर त्यांना नंतर प्रवास करण्यास देखील शक्य नसेल तर त्यांचे कुटुंब येणारे सर्व सण साजरे करण्यासाठी त्यांच्यासाठी मुंबईला येईल.”

हे देखील वाचा