Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड ब्राह्मणांवरील ‘त्या’ पोस्टनंतर गायक लकी अली यांनी मागितली माफी म्हणाले, “सगळ्यांनी एकत्र यावे हा उद्देश…”

ब्राह्मणांवरील ‘त्या’ पोस्टनंतर गायक लकी अली यांनी मागितली माफी म्हणाले, “सगळ्यांनी एकत्र यावे हा उद्देश…”

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक गायक म्हणजे लकी अली. बॉलिवूडमध्ये खूप कमी गाणी गाऊनही त्याने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली आहे. त्याची गाणी आजही तुफान ऐकली जातात आणि पाहिली. आज लकी बॉलिवूडपासून लांब असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या फॅन्सच्या संपर्कात आहे. मात्र नुकताच लकी पुन्हा एकदा एका मुद्यावरून चांगलाच गाजत आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘ब्राह्मण’ शब्द ‘अब्राहम’ या ‘इब्राहिम’ शब्दावरून घेतला असल्याचे सांगितले आहे. त्यावरून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते, त्यानंतर त्याने आता माफी मागितली आहे.

लकी अली यांनी त्यांच्या सोशल मेडियावरून एक पोस्ट शेअर करत माफ मागितली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, माझ्या आधी केलेल्या एका पोस्टमुळे वाद निर्माण झाला असल्याचे माझ्या लक्षात आले. तुमच्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, तसे झाले असल्यास मला त्याचे दुःख आहे. त्या पोस्टमागील माझा उद्देश केवळ आपण सगळ्यांनी एकत्र यावे हाच होता. माझे अनेक हिंदू बंधू-भगिनी दुखावले गेले. त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. यापुढे मी कोणतीही पोस्ट करताना अशा काही गोष्टींचा गंभीरतेने विचार करीन आणि सावध होऊन माझे मत व्यक्त करेल.”

दरम्यान लकी अली यांनी ९ एप्रिल रोजी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “ब्राह्मण या शब्दाची उत्पत्ती ब्रह्मा या शब्दापासून झाली असून, हा शब्द ‘अब्राम’पासून तयार झाला आहे. हा शब्द अब्राहम किंवा इब्राहिमपासून आला आहे. म्हणूनच ब्राह्मण देखील इब्राहिमचे वंशज आहेत. त्यामुळे आपण आपापसात भांडून काय सिद्ध करणार आहोत?”

हिंदी सिनेमातील सुपरस्टार आणि प्रतिभावान अभिनेते मेहमूद यांचे चिरंजीव असलेल्या लकी अली यांनी अतिशय सुपरहिट गाणी दिली. लोकांमध्ये त्यांची खूपच क्रेझ होती, मात्र नंतर त्यांचे करियर खाली गेले. पुढे वडील महमूद यांच्या निधनानंतर लकी अली यांनी मुंबईतून आणि मनोरंजनसृष्टीतून बाहेर पडत बंगळुरूमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि आता ते तिथे वास्तव्यास आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा