प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. याला कारणही तो मजेशीर व्हिडिओच आहे.
ए आर रेहमान यांनी त्यांच्या गायकीच्या आणि दर्जेदार संगीताच्या जोरावर ऑस्कर पुरस्कारावर देखील मोहोर उमटवली आहे. ए.आर. रेहमान हे त्यांच्या समाज माध्यमांवरील अकाऊंटवर बऱ्यापैेकी सक्रीय असतात. त्यावर ते नेहमीच काहीना का शेअर करत चाहत्यांसोबत जोडून राहतात.
अकाऊंटवर विविध फोटो अथवा व्हिडिओ ते शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पटाखा गुड्डी या गाण्याच्या प्रसिद्ध गायिकेचा मजेशीर मीम्स बनवण्यात आला आहे.
गायिका ‘ज्योति नूरां’ ही त्या व्हिडिओतअसा काही सुर लावते की, त्यामुळे कुत्रा-मांजरांपासून अगदी माणसे देखील जोरात पळू लागतात.
https://www.instagram.com/p/CKbZ0liAzD5/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ एडिटेड आहे. सदर व्हिडिओ शेअर करताना रेहमान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे कोणी एडिट केलं? हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. (singer made such a teasing tune man ran away with dogs and cats in fear rehman shared funny video)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खान एआर रहमानला स्टेजवर म्हणाला होता, एक मध्यम संगीतकार, तेव्हा घडला ‘असा’ मनोरंजक किस्सा
रोमियो-ज्युलिएटमध्ये, दिग्दर्शकाने फसवणूक करून मिळवले नग्न दृश्य, कलाकारांनी गुन्हा दाखल करत केली करोडोंची मागणी