Friday, July 5, 2024

काय सांगता! ‘या’ ३ कारणांमुळे रॅपर बादशाहवर जळतो मिका सिंग; स्वत:च केलाय खुलासा

सध्या झी टीव्हीवर ‘झी कॉमेडी शो’ सुरू आहे. या शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन पाहुणे येत असतात. यादरम्यान या शोमध्ये गायक बादशाहने हजेरी  लावली. या एपिसोडमध्ये अनेक खुलासे करण्यात आले. यावेळी या शोचा परीक्षक आणि गायक मिका सिंगला देखील काही प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न त्याच्या बादशाहच्या नात्या संबंधित होते. त्याचबरोबर दोघांनीही आपल्या नात्यासंबंधित अनेक मनोरंजक खुलासे केले.

यादरम्यान ‘बाबा की दरबार’ या अभिनयादरम्यान, संकेत भोसलेने चॅट शोमध्ये एँकर म्हणून संजय दत्तची भूमिका साकारली होती. दरम्यान, त्याने शोचा परीक्षक गायक मिका सिंगला विचारले की, अशा तीन गोष्टी कोणत्या आहेत, ज्यामुळे तो बादशाहवर जळतो?

मिका सिंगने दिले हे उत्तर
या प्रश्नावर उत्तर देत मिका सिंग मजेशीर पद्धतीने म्हणाला की,“सर्वप्रथम मला या गोष्टीचा हेवा वाटतो की, त्याचे प्रत्येक गाणे हे सुपरहिट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे, तो सहा फूट उंच आहे. या गोष्टीचा मला सर्वात जास्त हेवा वाटतो. त्याचबरोबर सर्वात शेवटी म्हणजे याचा मी एक भाग होतो. ते म्हणजे मागच्या दोन दशकांपासून मनोरंजन इंडस्ट्री आणि मी प्रतितास १०० किमी वेगाने पळत होतो, तर दुसरीकडे बादशाह २०० किमी वेगाने प्रति तास पळत होता. त्यामुळेच त्याने मला मागे टाकले. मी इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पंजाबमधून इथं आलो आणि त्याने एक दिवसात सर्व काही स्वतःकडे घेतले. त्यामुळे मी त्याच्यावर खूप जळतो.”

बादशाहने दिली यावर प्रतिक्रिया
मिकाच्या या उत्तराला प्रतिक्रिया देत बादशाह म्हणाला की, “हे खरं नाही, मिका पाजी हे राजा आहेत. परंतु मी लहान असताना मला हमर खरेदी करणारा पहिला व्यक्ती व्हायचे होते, परंतु मिका जीने हमर सर्वात अगोदर विकत घेतली. त्याचबरोबर, मला ‘समथिंग’सारखे गाणे गाण्याची इच्छा होती, पण त्यांनी ते गाणे देखील गायले आहे. त्यामुळे मी मिका सिंगवर खूप जळतो.”

खूप हसले लोक
या शो दरम्यान मिका सिंग आणि बादशाहने एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले. त्याचबरोबर दोघांनी गाणे देखील म्हटले. मात्र, याच्या व्यतिरिक्त शो दरम्यान उपस्थित असलेल्या प्रत्येक जणांनी या दोन्ही गायकांच्या कॉमिक अंदाजाचे फॅन झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा

-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’

-फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा