Saturday, July 6, 2024

गायक, रॅपर मिलिंद गाबाने बांधली गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लगीनगाठ, फोटो झाले व्हायरल

सध्या मनोरंजनविश्वात लग्नांचा सिझन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतेच बॉलिवूडमध्ये बिग बॅश असे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न संपन्न झाले. अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहे. या लग्नाच्या सीझनमध्ये अनेक लहानमोठे सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकत आहे. यातच आता अजून एक नाव सामील झाले असून, ते नाव आहे पंजाबी गायक आणि रॅपर असणाऱ्या मिलिंद गाबाचे. मागील बऱ्याच काळापासून मिलिंद त्याच्या लग्नाच्या चर्चांमुळे सतत गाजत होता.

मिलिंद गाबाने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड असणाऱ्या प्रिया बेनीवालसोबत साखरपुडा केला होता. मिलिंद आणि प्रिया मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मिलिंद बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझननंतर चांगलाच प्रसिद्ध झाला. भोजपुरी अभिनेत्री असलेल्या अक्षरा सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मिलिंद आणि प्रियाच्या हळदीच्या फंक्शनचे, मेहेंदीचे आणि व्रताचे काही फोटो शेअर केले आहेत. १४ एप्रिल रोजी मिलिंद आणि प्रिया लग्नबंधनात अडकले आहेत.

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग मिलिंद गाबाच्या लग्नात सामील झाली होती. तिने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लगांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “आमचा मुलगा घोडयांवर बसला’ या लग्नात अक्षराने लाल रंगाचा अतिशय सुरेख आणि आकर्षक लेहेंगा घातला असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. मिलिंद आणि प्रिया यांनी त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर एक ग्रँड पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये टेलिव्हिजन आणि सिनेविश्वातील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मिलिंदने त्याच्या लग्नाच्या प्री वेडिंग फंक्शनचे देखील फोटो शेअर केले होते.

मिलिंद आणि प्रिया मागील बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रियाने त्याला त्याच्या चांगल्या वाईट सर्वच काळात साथ दिल्याचे मिलिंदने अनेक वेळा सांगितले. मिलिंद पंजाबमधील प्रसिद्ध सिंगर असून त्याला बिग बॉस ओटीटीने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा