Monday, July 1, 2024

झक्कास! रोमँटिक अंदाजात नेहा कक्करने पती रोहनप्रीतबरोबर साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

बॉलिवूडमध्ये अशा खूप कमी गायिका आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्रींमध्ये नेहा कक्करचाही समावेश होतो. नेहा आज सर्वाधिक मागणी असणाऱ्या आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आपल्या गाण्यांव्यतिरिक्त नेहा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहा मागील वर्षी २४ ऑक्टोबर, २०२० मध्ये लग्नबंधनात अडकली होती. तिने गायक रोहनप्रीत सिंगसोबत संसार थाटला होता. त्यांची लव्हस्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. ते दोघेही बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) या जोडप्याने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

नेहा आणि रोहनप्रीत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी उदयपूरला पोहोचले आहेत. दरम्यान नेहाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. (Singer Neha Kakkar Celebrated Her First Marriage Anniversary With Hubby Rohanpreet Singh In Udaipur)

तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आणि आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असा दिसत होता!! अतिवास्तव बरोबर? आम्हाला विशेष वाटण्याची खात्री करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमचे आशीर्वाद, पोस्ट, स्टोरी, तुमचे टेक्स्ट मेसेज, कॉल्स आणि सर्व प्रेम यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.”

नेहा आणि रोहनप्रीतने पिछोला तलावाच्या मधोमध एका बोटवर आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. यादरम्यान नेहाने गुलाबी रंगाचा पारंपारिक ड्रेस परिधान केला होता, तर रोहनप्रीतने निळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे. चाहते नेहाच्या या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

नेहाने शेअर केलेले हे फोटो बघता बघताच जोरदार व्हायरल झाले. या फोटोंना आतापर्यंत २१ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नेहाच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘दिल को करार आया’, ‘ओ साकी साकी’, ‘तू ही यार मेरा’, ‘दिलबर’, ‘गर्मी’, ‘आँख मारे’, ‘एक तो कम जिंदगानी’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी साजरी केली पहिली करवा चौथ, पारंपरिक वेशभूषेत दिशाने वेधले लक्ष

-उर्वशी रौतेलाने बिकिनी घालून दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क

-जया बच्चनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा

हे देखील वाचा