बॉलिवूड गायिका नेहा कक्करने इंडस्ट्रीमध्ये नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे, पण आता बऱ्याच काळापासून ती ट्रोलिंगची शिकार बनली आहे. नेहा कक्कर आणि तिचा भाऊ सोनू कक्कर आपल्या भन्नाट लिरिक्स आणि म्युझिकमुळे अनेकदा चाहत्यांच्या निशाण्यावर येतात. नेहाने ‘आँख मारे’, ‘गर्मी’, ‘दिल को करार आया’ सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. मात्र, काही काळापासून तिची नवीन गाणी चाहत्यांना काहीच आवडली नाहीत.
नव्या लूकमुळे ट्रोल झाली नेहा कक्कर
अलीकडेच, तिने तिचा भाऊ टोनी आणि गायक हनी सिंग यांच्यासोबत ‘कांटा लगा’ हे गाणे गायले, हे गाणे चाहत्यांनी सरळ नाकारले. त्याचबरोबर, अलीकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. अलीकडेच नेहाने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती हिरव्या रंगाच्या घागऱ्यामध्ये दिसली. तसेच तिने ब्लॉन्ड लूक धारण केला होता. आता नेहा तिच्या फॅशन सेन्ससाठी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
नेहाने जी स्टाईल केली आहे, ती अनेकदा हॉलिवूडच्या अल्बम साँगमधील अनेक गायिका करतात. अशातच त्यांचा लूक कॉपी केल्यामुळे चाहत्यांनी नेहाची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला की, “कार्डी बी सारखे दिसण्याऐवजी, तू निब्बी दिसत आहेस.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “दीदी शकीरा दिसण्याऐवजी तू फकीरासारखे दिसत आहेस.” आणखी एकाने लिहिले की, “तू भूतासारखी दिसत आहेस नेहू.” दुसऱ्या एका नेटकऱ्यानी लिहिले, “कार्डी बीचे स्वस्त व्हर्जन.”
एकीकडे नेटकऱ्यांनी नेहाला जोरदार ट्रोल केले, तर रोहनप्रीतने त्याच्या पत्नीला पाठिंबा दर्शविला. नेहाच्या फोटोवर बोलताना त्याने लिहिले की, “ही खरंच तू आहेस का?” आणि त्याने अनेक हार्ट आणि फायर इमोजी देखील पोस्ट केल्या. यासह, भाऊ टोनी कक्करनेही आपल्या बहिणीच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
उल्लेखनीय म्हणजे नेहा कक्करला एखाद्या गोष्टीवरून ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी इंडियन आयडलमध्येही नेहा स्पर्धकांच्या प्रत्येक गोष्टीवर रडल्यामुळे ट्रोलिंगची शिकार झाली होती. प्रेक्षकांनी सांगितले की, स्पर्धकाची कथा इतकीही दुःखद नाही की, नेहाला लगेच रडू कोसळेल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट