Wednesday, June 26, 2024

‘बेस्ट रिटर्न गिफ्ट भावा…’, नेहा कक्करने भाऊ टोनी आणि पती रोहनप्रीतसोबतचा ‘या’ गाण्यावरील व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूडमध्ये आपल्या सुंदर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या गायिकांमध्ये नेहा कक्करचाही समावेश होतो. नेहा आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याची एकही संधी सोडत नाही. त्यासाठी ती सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी जोडलेली राहत असते. अशातच तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ तिने आपला भाऊ टोनी कक्करच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.

नेहा कक्करने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या भावासोबत आणि पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसत आहे. त्याचबरोबर ती ‘ओह सनम’ गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘हे तुझ्या वाढदिवसाची भेट नाहीये, हे आपले आहे, बेस्ट रिटर्न गिफ्ट भावा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर प्रेम आहे (I Love You).’

खरं तर शुक्रवारी (९ एप्रिल) टोनी कक्करने आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तिने अनेक व्हिडिओ शेअर केले, जे चाहत्यांना भलतेच आवडले आहेत. यापूर्वीही तिने अनेक व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये त्याचे ‘डम डम डिगा डिगा’ हे गाणे वाजत होते.

यासोबतच तिचा भाऊ टोनी कक्करनेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.ज्यामध्ये नेहा कक्करसह त्याचे संपूर्ण कुटुंंब डान्स करताना दिसत होते. हा व्हिडिओ खूपच रंजक होता.

नेहाने वयाच्या ४थ्या वर्षीपासून गायनाला सुरुवात केली होती. तिच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘दिलबर’, ‘ओ साकी साकी’, ‘तू ही यार मेरा’, ‘मिले हो तूम’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तर श्रीमंतांचं हेल्मेट’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातलेल्या डायमंड मास्करेडवर युजर्सची प्रतिक्रिया

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा