Tuesday, July 9, 2024

प्रियांका सिंगचं ‘हे’ नवीन गाणं यूट्यूबवर घालतंय धुमाकूळ; करेल तुमच्याही हृदयाला स्पर्श

‘छलकत हमरी जवनिया’ सारखे ब्लॉकबस्टर गाणे गाऊन आपली छाप पाडणारी गायिका प्रियांका सिंगने आपली वेगळी ओळख बनवली आहे. नुकतेच वर्ल्डवाइड रेकॉर्ड भोजपुरी म्युझिक कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून तिचे एक नवीन धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच यूट्यूबवर राडा घालत आहे.

नुकतेच या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या या गाण्याचे नाव ‘तकलीफ’ आहे. तिच्या या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका सिंगच्या आवाजाने वेदनादायी खळबळ उडवली आहे.

प्रियांका सिंग आणि पल्लवी गिरी यांचे ‘तकलीफ’ व्हिडिओ गाणे चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. यामध्ये पल्लवी गिरी चिंतेत आहे की, तिचा प्रियकर तिला विसरून दुसऱ्या कोणाशीतरी लग्न करत आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. त्याचे चित्रीकरण देखील भव्यदिव्य पद्धतीने केले आहे. यामध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. भोजपुरीचे हे गाणे प्रियांका सिंगने तिच्या खास स्टाईलने गायले आहे.

हे गाणे संतोष उत्पती यांनी लिहिले असून संगीत आर्य शर्मा यांनी दिले आहे. त्याचे दिग्दर्शक रवी पंडित आहेत. ऋतिक आरा यांनी या गाण्याचे कोरिओग्राफी केली आहे. गाण्याचे निर्माते विनीत शाह आणि एडिटर दीपक पंडित आहेत. हा व्हिडिओ रवी पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे. ते वर्ल्डवाइड रेकॉर्डमध्ये एकापेक्षा एक गाण्यांचे दिग्दर्शन करतात.

हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पल्लवी गिरीचे हे गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे आणि ते खूप व्हायरल करत आहेत. पल्लवीची आणखी बरीच गाणी सध्या यूट्यूबवर धमाका करत आहेत, त्यापैकी हे देखील आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

हे देखील वाचा