भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आजकाल आपल्या गाण्यांमुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व निर्माण करत आहे. त्याची अनेक सुपरहिट गाणी एकापाठोपाठ प्रदर्शित झाली आहेत. जी केवळ भोजपुरी इंडस्ट्रीमध्येच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही खूप ऐकली जात आहेत. आजकाल भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड गाण्यांचा भोजपुरी रिमेक बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. पवन सिंग या ट्रेंडचा झेंडा उंचावत आहेत. अलीकडेच, पवन सिंगचे नवीन ‘लुट गए’ भोजपुरी गाणे प्रदर्शित झाले आहे. जे इमरान हाश्मीच्या गाण्याचा भोजपुरी रिमेक आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर पवन सिंगचे ‘लुट गए’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे टी-सीरिजने प्रदर्शित केले आहे. ज्याच्या सौजन्याने ओरिजनल गाणे देखील बनवण्यात आले होते. पवन सिंगच्या उपस्थितीने गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्याला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत या गाण्याला ३,२०,७८४ व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे.
ओरिजनल गाण्यात इमरान हाश्मीसोबत युक्ती थरेजा दिसली होती. हे गाणे जुबिनने गायले होते आणि ते या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाले आहे. हे गाणे इतके लोकप्रिय झाले आहे की, ते बर्याचदा सोशल मीडियावर रील आणि इतर शॉर्ट व्हिडिओंसह ऐकले आणि पाहिले जात आहे. ओरिजनल गाण्याचे बोल मनोज मुंतशिरने लिहिले होते. भोजपुरी गाण्यात छोटू यादवने गाण्याला भोजपुरी टच दिला आहे.
पवन सिंगचा नवीन म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. ‘गाव के दशहरा’ असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे भक्तिभावाने प्रदर्शित करण्यात आले आहे. सर्व कलाकार देवीच्या भक्तीत मग्न झालेले दिसतात. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला तीन दिवसांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘गाव के दशहरा’ भोजपुरी गाण्याचा व्हिडिओ वेव्ह म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. चाहते त्यावर प्रचंड लाईक्स, जोरदार शेअर आणि प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ अभिनेत्री सौम्या पांडेवर चित्रित करण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’
-अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’