Saturday, April 19, 2025
Home भोजपूरी ‘या’ प्रसिद्ध गायिकेचा हातातून माइक काढून घेत स्टेजवर झाला अपमान, अभिनेत्री अक्षराने व्यक्त केला संताप

‘या’ प्रसिद्ध गायिकेचा हातातून माइक काढून घेत स्टेजवर झाला अपमान, अभिनेत्री अक्षराने व्यक्त केला संताप

कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांच्यात एक खूपच खास आणि अनोखे नाते असते. फॅन्सशिवाय कलाकारांच्या स्टारडमला महत्व नाही आणि त्यांचे अस्तित्व देखील नाही. कलाकार आहे तर त्यांचे फॅन्सदेखील हवेच. मात्र कधी कधी फॅन्समुळे कलाकारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. फॅन्सच्या प्रेमाचा अतिरेक झाला की कलाकरांना देखील मग फॅन्सवर चिडावे लागते. अशाच एका प्रसंगाला भोजपुरी गायिका असलेल्या प्रियंका सिंगळा सामोरे जावे लागले आहे. तिला या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात रडावे देखील लागले.

बिहारच्या गोपालगंजमध्ये थावा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात भोजपुरी गायिका प्रियांका सिंग देखील सामील झाली होती. ती स्टेजवर परफॉर्म करत असताना तिच्यासोबत असे काही झाले की तिला थेट रडूच कोसळले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसते की, गाणे गाताना सूत्रसंचालक रूपम त्रिविक्रम तिला मधेच थांबवतो. हे पाहून प्रियांकाला काही समजायच्या आत रुपम डीएमला सन्मानित करण्यासाठी बोलावते. प्रियंकाला दोन मिनिट बोलायचे होते, मात्र तिला बोलण्यास साफ नकार दिला गेला. सूत्रसंचालक म्हणाला खूप झाले मॅडम. यातच अजून एक व्यक्ती स्टेजवर येतो आणि तो प्रियांका कडून तिचा माइक हिसकावून घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani (@raniactres88)

हा व्हिडिओ पाहून भोजपुरी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अक्षरा सिंगने तिची नाराजी व्यक्त केली आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “एखाद्या कलाकारांसोबत इतक्या खालच्या पद्धतीचा व्यवहार होणे खूपच निंदनीय आहे. खूप नशिबाने देव काही लोकांना कलाकार म्हणून जन्माला घालतो. म्हणायला सभ्य समाजच्या अभद्रतेची ही पराकाष्ठा आहे. हे लोकं विसरून गेले की, एखाद्या स्टेजची मर्यादा आणि एक मुलगी त्याआधी एक कलाकारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला जात आहे. जेव्हा असे कोणत्याही कलाकारांसोबत होईल तेव्हा मी त्याचा असाच विरोध करेल” पुढे तिने हे देखील लिहिले आहे की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा अपमान करत आहे.

हे देखील वाचा