गायिका रेणू शर्माकडून धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे! ट्विटरवर लिहिलंय पत्र, वाचा काय म्हणतेय पत्रात…


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजणारा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर लावण्यात आलेला बलात्काराचा आरोप. दहा दिवसांपूर्वी  रेणू शर्मा या गायिकेने अचानक धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करत खळबळ माजवली होती. मात्र आता या महिलेने यू टूर्न घेत मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. धनंजय मुंडेंसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. त्या कौटुंबिक कारणास्तव त्यांची तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले आहे.

गायिका रेणू शर्मा यांनी ट्विट करत त्यांनी तक्रार का मागे घेतले याचे कारण दिले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी धनंजय मुंडे यांच्यावर लग्नाचे वचन आणि बलात्काराचा आरोप केला होता, या संदर्भात माझे हे निवेदन आहे. मला हे स्पष्ट सांगायचे आहे की माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून त्यांचा कोर्टात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली होते. मात्र, धनंजय मुंडे विरोधात जाताना पाहून मला वाटले की मी मोठ्या राजकीय राजकारणाचा बळी ठरत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेऊन चालवत आहेत आणि हे चुकीचे आहे.”

“मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव वाईट नात्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे करायचे नव्हते. शेवट मला एवढेच सांगायचे आहे, की धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. मला त्याच्याविरुध्द अशी कोणतीही तक्रार द्यायची नाही, कारण मला हे स्पष्ट करावेसे वाटते की मला लग्न आणि बलात्काराच्या आश्वासनाचा भंग करण्याची कोणतीही तक्रार नाही किंवा कोणताही अनुचित फोटो आणि व्हिडिओ नाही. हे विधान मी संपूर्ण जाणीवपूर्वक देत आहे,” असेही ती पुढे म्हणाली.

तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सांगितले होते की, “सदर गायिका त्यांना बदनाम करत ब्लॅकमेल करत आहे. मी मान्य करतो २००३ मध्ये गायिकेची बहीण करुणा शर्मा हिच्याशी माझे संबंध होते. ज्यातून मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. मी त्या दोन्ही मुलांना माझंच नाव देखील दिले असून याबद्दल माझ्या पत्नीला आणि नातेवाइकांना सर्व कल्पना आहे. मी मुलांसोबतच करुणाची देखील जबाबदारी उचलली आहे.”

 


Leave A Reply

Your email address will not be published.