Friday, July 5, 2024

रितेश पांडे- शिल्पी राजच्या ‘गजब करिहइया’ला मिळाले तब्बल १ मिलियन व्ह्यूज, मात्र ‘यामुळे’ ट्रोल अभिनेत्री झाली

आतापर्यंत अनेक भोजपुरी गायकांनी आपल्या आवाजाने भोजपुरी चित्रपटसृष्टीला हिट गाणी दिली आहेत. त्यांची काही गाणी तर अशी असतात, जी काही क्षणातच व्हायरल होतात. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक रितेश पांडे (Ritesh Pandey) हा उत्कृष्ट आवाजासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो गायनाव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये काम देखील करतो. रितेश आपल्या गाण्यांनी नेहमीच इंटरनेटवर राडा घालत असतो.

रितेश पांडे आणि अभिनेत्री श्‍वेता शर्मा यांचे गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेले ‘गजब करिहइया’ हे भोजपुरी गाणे हिट झाले आहे. चाहत्यांना हे गाणे खूप आवडले असून, चाहते त्याचे जोरदार कौतुकही करत आहेत. युट्यूबवर हे गाणे दहा लाख युजर्सने पाहिले आहे. याचा आनंद साजरा करताना अभिनेत्री श्वेताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमुळे ती ट्रोल झाली आहे.

श्वेताने केला आनंद व्यक्त
श्वेताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रितेश पांडेला टॅग करत एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही पोस्ट करत तिने लिहिले की, “युट्यूबवर दहा लाखांचा आकडा पार केला. यासाठी सर्वांचे आभार.”

या व्हिडिओमध्ये श्वेता छोटे कपडे परिधान करून या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टू-पीस ड्रेस परिधान केला आहे. श्वेताच्या शॉर्ट कपड्यांमुळे ती डान्स करताना एका ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे, ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

चाहते संतापले
श्वेताचे असे कपडे पाहून चाहते तिच्यावर भडकले आहेत. एकाने लिहिले की, “दोन मीटरचे कापडही का घातले आहेस, तेही घालू नका, फॉलोअर्स आणखी वाढतील. त्या सर्वांना पाहणे अधिक मनोरंजक असेल आणि तुमचे कुटुंब देखील खूप आनंदी होईल.” तर दुसऱ्याने लिहिले की, “आजकाल लोक शरीर प्रदर्शन करण्याला प्रतिभा मानतात.” आणखी एकाने लिहिले की, “तुमच्यासारखे लोक भारताची संस्कृती बिघडवत आहेत. तुम्ही इतके कपडे का घातले आहेत?”

रितेशला आवडला श्वेताचा ‘हा’ लूक
युजर्सच्या ट्रोलिंगला न जुमानता श्वेताचे या गाण्यासाठी तिचा सहकलाकार आणि गायक रितेश याने कौतुक केले आहे. त्याने ‘फायर’ इमोजीसह कमेंट करून श्वेताच्या पोस्टला प्रोत्साहन दिले.

‘हे’ गाणे १८ जानेवारीला झाले प्रदर्शित
हे भोजपुरी गाणे १८ जानेवारीला प्रदर्शित झाले आहे. हे गाणे शिल्पी राज आणि रितेश पांडे यांनी गायले असून, श्वेता आणि रितेश यांनी यात अभिनय केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा