Tuesday, July 9, 2024

आनंदवार्ता! राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका पुणेकरांसाठी घेऊन येतेय लाईव्ह काॅन्सर्ट

‘नादब्रह्म परिवार’ ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून पारिचित आहे. अशातच संस्थेचा यंदाचा 28वा वार्षिक मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत-नाट्य महोत्सव दि. 6, 7, 8 जानेवारी 2023दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या वर्षांचा महोत्सव राष्ट्रास समर्पित केला जात आहे.

या महोत्सवाची सांगता 67 वा राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवीन्द्र यांच्या “सावनी रवीन्द्र लाईव इन काॅन्सर्ट ” या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. सावनी रविंद्र ही आजची युवा पिढीतील आघाडीची लोकप्रिय गायिका आहे. “होणार सुन मी ह्या घरची” या अत्यंत लोकप्रिय मालिकेमधून तिचा आवाज घराघरात पोहोचला तसेच गेल्या वर्षीच्या 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारात तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानित केलं गेलं.

सानवी रवीन्द्रने मराठी भाषेबरोबरच तमिळ, तेलुगु ,मल्याळम ,गुजराती, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये आजवर गाणी गायली जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या विविध भाषांमधील गाजलेल्या गाण्यांचाही समावेश या कार्यक्रमात असणार आहे. त्याचबरोबर भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोषाल अशा अनेक दिग्गज गायकांची गाणेही सावनी सादर करेल.

या कार्यक्रमात भव्य वाद्यवृंद तसेच कोरस वृंद असणार आहेत. सावनी रविंद्र ही मूळची पिंपरी चिंचवड शहरातली गायिका आहे. अनेक दिवसानंतर सावनी स्वतःच्याच शहरात लाईव इन कॉन्सर्ट सादर करणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड करांसाठी आणि पुणेकरांसाठी ही पर्वणीच ठरेल. सुप्रसिध्द सिने नाट्य अभिनेता पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.(Singer Savaniee Ravindra brings live concert for the audience)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता हा गंध मनात ठेवून…’, सुव्रत जोशीच्या कलाकृतीची निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती

आनंद, समाधान, धाकधूक, नवंकाहितरी प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट तुफान चर्चेत

हे देखील वाचा