Saturday, June 29, 2024

अमेरिकेतील ‘या’ शहरात दरवर्षी साजरा केला जातो श्रेया घोषाल डे, जाणून घ्या त्यामागची रंजक गोष्ट

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला (Shreya Ghoshal) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या श्रेया घोषालने अनेक पुरस्कार आणि कामगिरी आपल्या नावावर केली आहे. पण आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयाच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. जो तिने देशात नाही, तर परदेशातही मिळवला होता. श्रेया घोषालच्या गाण्याचे अनेक चाहते आहेत. मात्र या गायिकेच्या चाहत्यांमध्ये अमेरिकेच्या गव्हर्नरच्या नावाचाही समावेश आहे. श्रेया रविवारी (12 मार्च)ला तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये श्रेया घोषालचा 12 मार्च 1984 रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून संगीत शिकलेल्या श्रेयाच्या नावाने एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. नोटांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेया घोषालच्या सन्मानार्थ दरवर्षी श्रेया दिवस साजरा केला जातो. पण विशेष म्हणजे गायिकेला हा सन्मान तिच्या देशात नाही, तर अमेरिकेत मिळाला आहे. ही गोष्ट 2010 सालची आहे जेव्हा प्रसिद्ध भारतीय गायिका उन्हाळ्याच्या दिवसात अमेरिकेला गेली होती.

यादरम्यान श्रेयाला ओहायो राज्यातून दुर्मिळ सन्मान मिळाला. गव्हर्नर टेड स्ट्रिकलँड यांनी 26 जून हा दिवस श्रेया घोषाल दिवस म्हणून घोषित केला. राज्यपालांच्या या घोषणेनंतर दरवर्षी 26 जून रोजी अमेरिकन सिटी ओहायोमध्ये श्रेया घोषाल दिवस साजरा केला जातो. गायिकेला मिळालेल्या या सन्मानाने श्रेयाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जन्मेलेल्या श्रेया घोषालचे पालनपोषण राजस्थानमधील रावतभाटा येथे झाले. वयाच्या सहाव्या वर्षी तिने शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण सुरू केले. अभ्यासासोबत संगीताचे धडे घेतलेल्या श्रेया घोषालने वयाच्या सोळाव्या वर्षी म्युझिक रियॅलिटी शो ‘सा रे ग मा’ जिंकला आहे.

श्रेया घोषालची एकूण संपत्ती
माध्यमांतील वृत्तानुसार, श्रेयाकडे 182 कोटींची संपत्ती आहे. तिची सर्वाधिक कमाई लाइव्ह शो, चित्रपटांमधून होते. ती महिन्याला 1 कोटींहून अधिक कमावते

करिअरबद्दल बोलायचे झाले, तर श्रेयाने 2000 साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात गाणे गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि इंडस्ट्रीत एकापेक्षा एक गाणी दिली. श्रेया घोषालने कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण यांसारख्या प्रस्थापित गायकांसह ‘सिलसिला ये चाहत का’, ‘बैरी पिया’, ‘मोरे पिया’ आणि ‘डोला रे डोला’ अशी पाच गाणी गायली आहे.(singer shreya ghoshal birthday shreya ghoshal day is celebrated on 26 june in every year in ohio know the story behind this day)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! हिंदी सिनेमातील ‘या’ जेष्ठ दिग्दर्शकांच्या दोन्ही किडन्या निकामी?

अभिनेत्री रिद्धिमा पंडितने घेतला मोठा निर्णय; 32 व्या वर्षी केले एग्स फ्रीज

हे देखील वाचा