आपल्या मधुर सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजेच श्रेया घोषाल होय. श्रेयाच्या कुटुंबात नुकत्याच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. २२ मे रोजी श्रेयाने मुलाला जन्म दिला. श्रेयाने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून ती चर्चेत आहे. सुरुवातीला चाहत्यांना उत्सुकता होती की, श्रेयाला मुलगा होईल की मुलगी. मात्र, हे २२ मे रोजीच स्पष्ट झाले होते. परंतु आता आणखी एक गोष्ट चाहत्यांना जाणून घ्यायची होती की, मुलगा आणि आईची झलक केव्हा पाहायला मिळेल. तसेच मुलाचे नाव काय असेल? आता ही आतुरताही संपली आहे.
श्रेयाने दाखवली मुलाची पहिली झलक
खरं तर श्रेयाने आपला मुलगा आणि पती शिलादित्य मुखोपाध्यायसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने यासोबतच आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. श्रेयाने शेअर केलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे. चाहते तिच्या मुलाचे नाव आणि त्याच्या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
श्रेयाने ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ती आपला मुलगा आणि पतीसोबत दिसत आहे. काही क्षणातच हा फोटो व्हायरल झाला. चाहत्यांकडून या फोटोवर प्रेम व्यक्त केले जात आहे. श्रेयाने या फोटोला कॅप्शन देत मुलाच्या नावाचा खुलासाही केला आहे.
Introducing- ‘Devyaan Mukhopadhyaya’
He arrived on 22nd May & changed our lives forever. In that first glimpse as he was born he filled our hearts with a kind of love only a mother, a father can feel for their child. Pure uncontrollable overwhelming love❤️ @shiladitya pic.twitter.com/MbD386CdqC— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) June 2, 2021
श्रेयाने लिहिले की, “आम्ही आज तुमची भेट ‘देवयान मुखोपाध्याय’सोबत करत आहोत. त्याने २२ मे रोजी जन्म घेतला आणि आमचे आयुष्यच बदलून टाकले. त्याच्या पहिल्याच झलकने आमचे हृदय प्रेमाने भरले होते. केवळ एक आई- वडील आपल्या मुलासाठी हे जाणवू शकतात. मी खूप खुश आहे आणि खूप खूप प्रेम.” यासोबतच तिने आपल्या पतीलाही टॅग केले आहे.
काय आहे देवयानचा अर्थ?
श्रेयाने आपल्या मुलाचे नाव देवयान ठेवले आहे. याचा अर्थ देवांचा रथ असा होतो. तरीही, याचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे, देवांची सेवा करणे. श्रेयाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-