Friday, July 5, 2024

सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी अपडेट! पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील २ मोठ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सिद्धूच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धूच्या वडिलांनी डीजीपी यांच्याकडे संगीत क्षेत्राशी संबंधित २ व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोन व्यक्तींची नावे नोंदवली आहेत. हे दोघेही पंजाबी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सिद्धूची जवळपास ५० गाणी आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या दोघांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी करत आहेत.

ज्या दिवशी सिद्धूच्या वडिलांनी एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे, त्याच दिवसापासून मानसाचे एसएसपी तसेच वरिष्ठ अधिकारी सिद्धूच्या वडिलांच्या संपर्कात आहेत. तसेच, ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या चलनमध्ये संगीत क्षेत्रातील दोन मोठ्या नावांची पोलिसांनी नावे नोंदवली आहेत. नवज्योतसिंग पंढेर आणि कंवर ग्रेवाल अशी ही नावे असून, त्यांची नावेही या खटल्यात नोंदवली गेली आहेत.

दुसरीकडे, पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलीस शुक्रवारी (दि. २६ ऑगस्ट) सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मानसा कोर्टात चार्जशीट दाखल करणार आहेत. पोलिसांच्या सूत्रांनुसार, सिद्धू हत्या प्रकरणात (Sidhu Moosewala Murder Case) २६हून अधिक लोक आरोपी आहेत आणि या प्रकरणातील २ व्यक्तींची हत्या झाली आहे. तसेच, तीनजण अजूनही फरार आहेत. यामध्ये आरोपींसोबतच साक्षीदारांची संख्याही ४० हून अधिक आहे. त्यात सिद्धूचे वडील उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय यामध्ये घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांपासून ते शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत अनेक प्रत्यक्षदर्शींना साक्षीदार करण्यात आले आहे.

पंजाबच्या मानसामध्ये २९ मे रोजी पूर्ववैमनस्याच्या वादातून काही लोकांनी सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. सिद्धूची गणना प्रसिद्ध गायकांमध्ये होते. सन २०१७ मध्ये ‘जी वॅगन’ या गाण्याने गायन प्रवासाची सुरुवात केल्यानंतर सिद्धूला त्याच्या अल्बम्सने लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याचे चाहते जगभरात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक
भाईजानला बॉलिवूडमध्ये ३४ वर्ष पुर्ण, खास व्हिडिओ शेअर करत केली ‘ही’ मोठी घोषणा
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी विजयने पाच पटींनी वाढवलं मानधन, अनन्या पांडे तर जवळपासही नाही

हे देखील वाचा