पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) आता आपल्यात नाही. २९ मे रोजी दिवसाढवळ्या गायकाची हत्या झाली होती, त्यानंतर चाहते रोज पाणावलेल्या डोळ्यांनी त्याची आठवण काढतात. पण जाता जाता सिद्धू मूसेवालाने त्याच्या चाहत्यांना एक गाणे दिले, जे त्याच्या मृत्यूनंतर रिलीझ झाले. या गाण्याचे शीर्षक ‘SYL’ असे असून, ते यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते. हे गाणे सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले. तसेच या गाण्यामुळे वादही निर्माण झाला होता, त्यामुळे काही तासातच हे गाणेही यूट्यूबवरून डिलीट करण्यात आले आहे.
गाण्यात गायकाने मांडलाय गंभीर मुद्दा
सिद्धू मूसेवालाचे हे गाणे सहा मिनिटांचे होते, जे अवघ्या दोन तासांत २२ लाख लोकांनी पाहिले. गायकाने आपल्या शेवटच्या गाण्यात पंजाब आणि हरियाणामध्ये सुरू असलेल्या एसवायएलचा मुद्दा उपस्थित केला. गाण्यात सिद्धूने शेतकरी आंदोलन आणि लाल किल्ल्यावरून सुरू झालेल्या कृषी कायद्यांबाबतही सांगितले आहे. यासोबतच आम आदमी पार्टीचे हरियाणाचे प्रभारी सुशील गुप्ता यांचे वक्तव्यही या गाण्यात होते, ज्यात त्यांनी हरियाणात सरकार स्थापन झाल्यास एसवायएलचे पाणी राज्याला मिळण्याबाबत बोलले होते. सहा मिनिटांच्या या गाण्याला २.१४ लाख लोकांनी लाईक केले आणि २ लाख ५२ हजार लोकांनी यावर कमेंट केल्या. (singer sidhu moosewala latest song syl removed from youtube)
गाण्यावर करण्यात आली कारवाई
गायकाच्या या शेवटच्या गाण्यामुळे पंजाब आणि हरियाणा दरम्यान सुरू असलेल्या एसवायएलच्या मुद्द्याला हवा मिळाली, त्यामुळे हे गाणे यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. गायकाचे हे गाणे त्याच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवर अपलोड करण्यात आले असून, मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडे कायदेशीर तक्रारी केल्यानंतर ते यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे.
गाण्यावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
सिद्धू मूसेवालाच्या या गाण्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. हरियाणवी कलाकार गजेंद्र फोगटने या गाण्याच्या बोलांना कडाडून विरोध केला असून, त्याऐवजी नवीन गाणे बनवण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे ते हरियाणाच्या वतीने उत्तर देणार आहेत. सिद्धूच्या कुटुंबीयांनी हे गाणे रिलीज केले नसावे, असेही त्याने म्हटले आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतो की, गोंधळामुळे लोकांना गाण्याचे बोल नीट समजले नाहीत. ज्यांना शेतकऱ्यांमध्ये दहशतवाद दिसतो तेच लोक या गाण्याचा हेवा करतात, असे त्यांचे मत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा