Saturday, April 20, 2024

लाऊडस्पीकरच्या वादावर सोनू निगम दिली ही’ वैयक्तिक प्रतिक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सध्या देशभरात मशिदीवरील भोंगे आणि अजान विरोधातील वाद जोरदार सुरू आहे. राजकीय मैदानात या विषयावर सध्या जोरदार फैरी सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात हे मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर यापेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता यावर आता अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. याच विषयावर गायक सोनू निगमनेही (Sonu Nigam) आपले मत व्यक्त केले आहे. 

सोनू निगम हा हिंदी संगीत क्षेत्रातील आघाडीचा गायक म्हणून ओळखला जातो. आपल्या जादूई आवाजाने तो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो.गायक सोनु निगम हा त्याच्या जादूई आवाजाइतकाच परखड आणि बिनधास्त वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर तो आपले मत व्यक्त करत असतो. चर्चेत असलेल्या मशिदीवरील भोंग्याविषयीच्या मुद्द्यावरही त्याने आपले मत व्यक्त केले आहे. याबद्दल बोलताना सोनू निगमने जो आवाज मी खूप आधी उठवला होता. त्याचे पडसाद आत्ता उमटायला लागले आहेत असे मत व्यक्त केले आहे.

तत्पुर्वी गायक सोनू  निगमनेच पहिल्यांदा याविषयी आवाज उठवला होता. २०१७ मध्ये त्याने अजान बंदीची मागणी केली होती. त्यामुळे आता पून्हा एकदा त्याचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. फक्त सोनू निगमच नव्हेतर अनेक कलाकारांनी या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. याआधी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अजानबद्दल बोलताना मला कोणत्याही धर्मावर टीका करायची नाही पण सगळीकडे लाउडस्पिकरवर बंदी असताना आपल्या इकडेच अशा प्रकारचे वातावरण का तयार केले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे हा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान गायक सोनू  निगम सध्या पद्यश्री पुरस्काराने सन्मानित केल्याने आनंदीत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा