Saturday, May 10, 2025
Home बॉलीवूड रिमिक्स गाण्यांबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकांची ‘मोठी’ प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला आजचे रिमिक्स कल्चर अजिबात…’

रिमिक्स गाण्यांबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकांची ‘मोठी’ प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला आजचे रिमिक्स कल्चर अजिबात…’

जसा जसा काळ बदलत आहे, तसे तसे चित्रपटाचे स्वरूप बदलत चालले आहे. ७० च्या दशकातील गाणी आपली छाप चाहत्यांच्या मनावर टाकण्यात यशस्वी झाली. मात्र, काळाच्या प्रवाहानुसार पाहिले, तरी देखील या गाण्यांना चाहते अजूनही विसरले नाहीत. त्या वेळची कित्येक गाणी सुपरहिट ठरली. अजूनही ती गाणी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आजकालच्या चित्रपटांमध्ये अशी कित्येक गाणी रिमिक्स करून प्रदर्शित केली जातात. मात्र, जुन्या गाण्यांचे सुर चोरल्याचा आरोप अनेक गायक करत आहेत. अशातच आता विशाल भारद्वाज यांनी त्यांना रिमिक्स गाणी अजिबात आवडत नाहीत असे म्हटले आहे.

विशाल भारद्वाज यांनी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी एक नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. विशाल भारद्वाज हे चित्रपट जगतातील त्या लोकांपैकी एक आहेत, ज्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबरोबरच अप्रतिम संगीतासाठी त्यांचे खूप कौतुक केले जाते. विशाल भारद्वाज लताजींसाठी प्रदर्शित करत असलेले गाणे २२ वर्षांपूर्वी रेकॉर्ड केले होते, पण काही कारणांमुळे हा चित्रपट बनू शकला नाही.

विशाल भारद्वाज यांना रिमिक्स गाणी आवडत नाहीत
विशाल भारद्वाज आजच्या रिमिक्स गाण्यांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मला आजचे रिमिक्स कल्चर अजिबात आवडत नाही. मला असे वाटते की, दुसर्‍याच्या कामात अशाप्रकारे फेरबदल करणे ही एखाद्याची क्रिएटिव्हिटी खराब करण्याची गोष्ट आहे, ती करू नये. ‘लैला ओ लैला’ या गाण्याबद्दल माझा मुलगा म्हणाला की, हे गाणे खूप चांगले आहे. माझ्या मुलाला माहिती नव्हते की, ते एका जुन्या चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचे मूळ स्त्रोत काय आहे, हे लोकांना माहित नाही. मला वाटते की, ते कोणाचीतरी क्रिएटिव्हिटी खराब करत आहे.”

६०-७० च्या दशकातील संगीत आवडते
विशाल यांनी कोणत्या दशकातील संगीत सर्वात जास्त आवडले हे सांगितले. ते म्हणाले, “प्रत्येक संगीत त्याचा काळ दाखवत असते. आमचे संगीत हे चित्रपट संगीत आहे. मला वाटते मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर चित्रपटाचे कल्चर निर्माण झाले आहे. जे वास्तव चित्रपटांमध्ये येऊ लागले आहे. त्यानंतर संगीत देखील वेगळे झाले आहे. मला ६०-७० च्या दशकातील संगीत आवडले, तो आमचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी एकापेक्षा एक दिग्गज संगीतकार होते. आपण आपले दशक ओळखू शकत नाही, कदाचित पुढच्या पिढीला ते समजेल.”

गुलजार यांनी दिला सल्ला
गुलजार यांनी सांगितले की, त्यांच्या प्रत्येक गाण्याबरोबर त्यांची गाणी स्क्रिप्ट आणि पात्राशी संबंधित आहेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, “ती पात्रं जी भाषा बोलत आहेत, त्याची मी काळजी घेतो. ज्यांना ते गाणे गायचे आहे जेणेकरून ते त्यांच्याशी जुळतील, त्यांना त्यांच्यापेक्षा वेगळे वाटणार नाही आणि मी त्यांना ज्या धूनला गुंफायचे आहे, त्याची काळजी घेतो. ती धून संगीत दिग्दर्शकाकडून येते. २०- २५ वर्षांपासून मी एक गोष्ट सांगत आहे की, सूर नेहमी प्रथम येतो. क्वचितच असे घडते की, शब्द प्रथम येतात. त्या काळातील संगीतकारांना भाषा माहिती होती, म्हणून जर त्यांनी त्यांना वर्णमाला दिली असती, तर त्यांनी ती खूप चांगली केली असती. आजच्या युगात या गोष्टीचा अभाव आहे की, आज आपले बोल इंग्रजी आहेत आणि गाणी हिंदी हवी आहेत.”

विशाल भारद्वाज बनवणार नवीन गाणी
विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, याव्यतिरिक्त आणखी गाणी बनवण्याचा त्यांचा विचार आहे. ते म्हणाले की, “आमच्याकडे लंडन चित्रपट होता, ज्यात लताजींनी गायलेले ‘तनहाई’ हे गाणे होते. याशिवाय अनेक गाणीही आहेत. मी सनी देओलला भेटून ती टेप मागेल.”

विशाल भारद्वाज यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी ‘माचीस’, ‘मकबूल’, ‘ओंकारा’ आदी अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होण्यापूर्वीच ‘या’ स्पर्धकाला पॅनिक अटॅक; सुरू होण्यापूर्वीच सोडला शो

-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल

हे देखील वाचा