Monday, July 1, 2024

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री काजल अग्रवालचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत; ग्लॅमरस अंदाजात दिसतेय खूपच सुंदर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री काजल अग्रवाल ही एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्ये देखील नाव कमवण्यात यशस्वी ठरली आहे. काजल ही तिच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त असते, तरी देखील ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिचे नवीन फोटो बघण्यासाठी खूप उत्सुक असतात. नुकतेच तिने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काजलने गुलाबी आणि निळ्या रंगाच्या ड्रेस मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती नेहमीच सर्वांच्या चर्चेत असते. तिच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप आहे.

काजलने चित्रपटात देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘सिंघम’ या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात तिने अजय देवगण सोबत काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.

काजलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिने गौतम किचलू याच्यासोबत लग्न केले आहे. त्या दोघांचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. यामधून त्यांची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यांची जोडी देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिच्या फोटोवर नेहमीच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो.

काजलने तिच्या करिअरमध्ये , ‘मगधिरा’, ‘मुंबई सागा’, ‘इंडियन 2’, ‘आचार्य’, ‘सीता’, ‘जिला’, ‘पॅरिस पॅरिस’, ‘डार्लींग’,’मारी’, ‘विवेगम’, ‘नायक’, ‘सरदार’ या चित्रपटात काम केले आहे.

या चित्रपटांतील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा