Monday, July 1, 2024

अभिनेता आकाश ठोसर याने लग्नासाठी घातली अनोखी अट; बातमी वाचाच

अभिनेता ‘आकाश ठोसर’ याला ‘सैराट’ या मराठी चित्रपटामुळे एक विशेष ओळख मिळाली. या चित्रपटातील भूमिका साकारणाऱ्या व्यक्ती आणि त्याचे पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे घराघरात पोहोचले. नुकतीच त्या आर्ची आणि परश्या हे रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चांना उधान आले होते. पण आम्ही दोघे फक्त चांगले मित्रच आहोत त्या पलीकडे काहीच नाही असे म्हणत त्यांनी सर्व चर्चांचे त्यांनी खंडन केले. पण आता आकाश पुन्हा चर्चेत आला आहे. एक म्हणजे त्याचा नवीन चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘नागराज मंजुळे’ करत आहेत. दुसरे म्हणजे आकाश एका मुलाखतीत त्याला लग्नासाठी कशी मुलगी पाहजे आहे? यावर त्याने जे उत्तर दिले त्यावरून तो तुफान चर्चेत आला आहे.
नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिरयानी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 7 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहे. नुकताच  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दमदार ट्रेलर आणि अभिनय, नवीन कोर्या करकरीत भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांना उत्सुकता लागली ती चित्रपटाची.

आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आकाश याने एक मुलाखत दिली. त्यात त्यात त्याला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुला स्वयंपाक बनवता येतो का? त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावरून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे. आकाशने असे उत्तर देत म्हणाला की, स्वयंपाक घरातील काही आठवणी ताज्या केल्या. “मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण मी पाच वर्ष तालीममध्ये राहिलो आहे. त्या ठिकाणी स्वतःचे जेवण स्वतःच बनवावे लागते. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण स्वतःचे जेवण स्वतःच बनवायचो.”

पुढे त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे हे सुद्धा त्याने सांगितले. तो म्हणाला की, मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे की, ज्या मुलीला बिरयानी खूप छान बनवता येईल. मला तिच्याशी लग्न कार्याला नक्की आवडेल. कारण ज्या मुलीला  बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो. असे तो म्हणाला. (sirat fame akash thosar new movie ghar banduk biriyani told condition for marriage with girl)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

लावणी कलाकार मेघा घाडगे हिला नेमकं का केल जातंय ट्रोल? काय आहे प्रकरण, एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा