Wednesday, June 11, 2025
Home अन्य शालिनी पांडेच्या बहिणीची सिनेसृष्टीत धमाकेदार एंट्री, सांगितला ६ वर्षाचा संघर्षमय प्रवास

शालिनी पांडेच्या बहिणीची सिनेसृष्टीत धमाकेदार एंट्री, सांगितला ६ वर्षाचा संघर्षमय प्रवास

बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने एक ओळख निर्माण करणारी शालिनी पांडे आणि आता तिची छोटी बहीन पुजा पांडे ही देखील मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सामान्य घरातून आलेली शालिनी पांडेनी आधी अभिनय क्षेत्रात आपला पाय रोवला आणि आता तिची बहिन देखील या क्षेत्रात उतरत आहे. या बहिणीच्या आयुष्याबद्दल थोडी माहिती जाणून घेउया.

साउथ इंडस्ट्रीमधील 2017 मध्ये प्रदर्शित ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात प्रितीची भुमिका बजावणारी शालिनी पांडे(Shalini Pandey) हीने आपली ओळख निर्मान केली. या चित्रपटामुळे तिला जगभरात ओळख मिळाली आणि यशाचे शिखर गाठले होते. त्यामुळे शालिनी पांडे आणि विजय देवरकोंडा या दोघांच्या करिअरला पुढे घेउन जाण्यासाठी या चित्रपटाने साथ दिली. या चित्रपटानंतर याशराज फिल्मची नजर शालिनी पांडेवर पडली आणि तीला बॉलिवूड चित्रपट जयेश भाई जोरदार या चित्रपटामध्ये रणवीर सिंगच्या बायकोचे मुख्य भुमिकेत घेतले. आता शालिनी पांडेची बहिन पुजा पांडे(Pooja Pandey) ही देखिल आपल्याल बहिनीच्या पावलावर पाऊल टाकत आहे. एका मुलाखतीदरम्यान शालिनीने आपली बहिन पुजा पांडेच्या येणाऱ्या चित्रपटाविषयी मीडियाला खूप
वेळ महिती दिली.

पुजा पांडेचा दुसरा चित्रपट

शालिनी पांडेची बहिन पुजा पांडे हीचा पुढच्या हप्त्यात ‘सिया’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पुजा ‘रेप विक्टम’ ची भुमिका करत आहे यामध्ये तिच्या सोबत ‘विनीत कुमार’ देखिल पहायला मिळणार आहे. पुजाने मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ‘मी चित्रपटाआधी संजय मिश्रा आणि विवान शहा यांच्यासोबत ‘कोट’ चित्रपचामध्ये काम केले आहे. पण काही कारणाने हे चित्रपट प्रदर्शित झले नाही म्हणुन ‘सिया’ ला मी माझा डेब्यु चित्रपट मानत आहे.’

आई सोबत राहुन शिकली क्लासीकल डांन्स

पुजा पांडेचा जन्म 8 जलै 1996 मध्ये जबलपुर गावामध्ये साधारण घरामध्ये झाला होता. शाळेचे शिक्षण चर्च गर्ल्स हाय स्कूल मधून पुर्ण केले होते. पुजा पांडेचे वडील चंद्रभूषन पांडे हे गन गैरेज फैक्ट्रीमध्ये ऑफिसर होते या तिथे तोप बनवली जात होती. आता ते निवृत्त झाले आहेत. “माझी आई माया पांडे लग्नाआधी एका शेळेमध्ये शिक्षिका होती. लग्नानंतर त्यांनी काम सोडले आणि घरामधले काम बघून मुलांना नृत्य आणि संगित शिकवत होती. आई सोबत राहुन मी क्लासीकल डांन्स शिकले आहे. ”

लहानपनापासूनच आवड होती करिश्मा आणि करिना बनण्याची

लहानपनीच्या आठवनी सांगत पुजा पांडे सांगते की, “आम्ही लाहानपनी आरशासमोर उभे राहुन करिश्मा आणि करिना बनून ऑक्टिंग करत असायचो, शालिनी मोठी असल्यामुळे ती नेहमी हट्ट करुन करिनाच बनत होती. तसं ती आहे थोडीफार करिनासारखी आम्हाला लहानपनासूनच हिरोईन बनायचे होते.”

शिक्षण पूर्ण झाल्यावर पुजाने थिएटर

पुजाने जबलपुरमध्ये तीन वर्ष थिएटर केले यानंतर ती म्हणते, “माझ्या वडिलांचे अरुन पांडे रंग भरन थिएटर ग्रुप चालवत होते . आधी माझ्या बहिनीने तिएटर केले होते आणि मग मीही तिचे पाहुन थिएटर केले. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी माझ्या वडिलांनी खूप पाठिंबा दिला आहे. त्यांना वाटत होते की ताईने इंजीनिअर क्षेत्रात करिअर करावे. पण आमचे मन अभिनय क्षेत्रात होते आणि तरीही माझ्या बाबाने आमचे खूप समर्थन केले.”

सहा वर्षानी मिळाली संधी

पुजा पांडे 2016 साली मुंबई मध्ये आले आणि तीला चांगले काम मिळण्यासाठी 6 वर्ष लागले ती म्हणते की, मी खूपसारे रिजेक्शन सहन केले आहेत, मी खूपसाऱ्या प्रोडक्शन हाउसमध्ये फिरले आहे एवढे सगळे प्रोडक्शन हाउस फक्त नावासाठी आहे. 2016 साली मला सोनी टीव्हीवर ‘मन है विश्वास का’ या मध्ये एका एपिसोडमध्ये काम मिळाले होते. त्याच्या दोन वर्षापर्यत माझ्याकडे काम नव्हते. यानंतर मी विनय राव आणि राधिका राव यांचा विज्ञापन चित्रपट केला. मग मला कोट चित्रपट मिळाला पण तो प्रदर्शित नाही.

हेही वाचा

कॅटरिनाच्या ‘या’ सवयीने वैतागला अभिनेता इशान खट्टर; म्हणाला, ‘तिच्याशी बोलणे म्हणजे भिंतीशी…’

‘या’ गोष्टीला बॉयफ्रेंड आदील खानने घातली बंदी, राखी सावंतने केला खुलासा; म्हणाली, ‘इस्लाममध्ये असे…’

सारा अली खानचा हेअर स्टाईलिस्टसोबत रोमान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हे देखील वाचा