Monday, July 1, 2024

‘स्लॅमबुक’ चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण; अभिनेत्री रितिका श्रोत्रीने खास पोस्ट केली शेअर

ऋतुराज धालगडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्लॅमबुक’ हा चित्रपट चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटातील पात्र, डायलॉग तसेच चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून किशोर वयातील मुलांची एक सुंदर प्रेमकहाणी दाखवली होती. जी प्रेक्षकांना खूप भावली होती. या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांनी काम केले होते. त्यामुळे या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले होते. हा चित्रपट २१ ऑगस्ट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. नुकतेच या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. यातच या चित्रपटाची अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने या चित्रपटातील काही फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे.

रितिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे. यामध्ये रितिका, शंतनू रांगणेकर आणि दिलीप प्रभावळकर दिसत आहे. तसेच दुसऱ्या दोन फोटोंमध्ये रितिका दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “स्लॅमबुकचे ६ वर्ष” तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहे. (slambook movie complete 6 years, actress ritika shrotri share a post on social media)

या चित्रपटात रितिका श्रोत्री, शंतनू रांगणेकर, दिलीप प्रभावळकर, मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, कुशल बद्रिके, सुप्रिया पाठारे, मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे, योगेश शिरसाठ यांनी काम केले होते. या सगळ्या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या.

जेव्हा एक तरुण मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो, तेव्हा त्याचे आजोबा कशाप्रकारे त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी त्याला मदत करतात, हे या चित्रपटातून दाखवले आहे. त्यांची ही मजेशीर प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी रितिका श्रोत्री एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तिने ‘टकाटक’, ‘डार्लिंग’, ‘बॉईज’, ‘बॉईज २’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘बकेट लिस्ट’, ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘लॉस्ट अँड फाउंड’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा