Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड Akshay Kumar Tiger Shroff : असं काय घडलं ? चाहत्यांनी थेट अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफवर फेकल्या चपला

Akshay Kumar Tiger Shroff : असं काय घडलं ? चाहत्यांनी थेट अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफवर फेकल्या चपला

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बड़े मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chote Miyan ) चित्रपटामुळं चर्चेत आहेत. दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अनेक ठिकाणी भेट देत आहेत. अशातच धक्कादायक प्रकार समोर आला. प्रमोशनदरम्यान चाहत्यांनी थेट दोन्ही अभिनेत्यांवर चपला दगड फेकल्या. असं नेमकं काय घडलं? जाणून घेवुयात.

लखनौमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ (Akshay Kumar Tiger Shroff) आगामी ‘बड़े मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chote Miyan )चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. यादरम्यान दोघांची एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

]दरम्यान चाहत्यांनी एकमेकांवर चप्पल फेकून मारल्या. त्यातील काही चप्पल स्टेजपर्यंतही गेल्या. मंचावर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उपस्थित होते. काही चाहत्यांनी तर हेल्मेटदेखील फेकून मारलं.

इतकेच नव्हे तर यावेळी गर्दीत काही लोकांनी फायदा घेत तरुणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी पोलिसांनी खबरदारी घेत मुलींची गर्दीतून सुटका केली. तसेच, चेंगराचेंगरीत अनेकांचे मोबाईलही गायब झाले.

प्रमोशनादरम्यान, दोन्ही अभिनेत्यांनी हवेत टी- शर्ट भिरकावला. हा टी- शर्ट घेण्यासाठी चाहत्यांची चढाओढ झाली. काहींना टी-शर्ट मिळाले तर अनेकजण रिकाम्या हाती परत गेले. यावेळी संतप्त लोकांनी गर्दीत चपला आणि दगडं फेकुन तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा:

‘ओम शांती ओम’मध्ये खलनायकाची भूमिका करताना अस्वस्थ होता अर्जुन रामपाल, स्वतः केला खुलासा

एअर होस्टेसच्या भूमिकेतून चर्चेत आल्या होत्या या अभिनेत्री, वाचा यादी

हे देखील वाचा