Sunday, June 22, 2025
Home टेलिव्हिजन अंकिता लोखंडे आणि विकी जैन ठरली ‘स्मार्ट जोडी’, चमचमणारी ट्रॉफी आणि बक्षीस म्हणून मिळाली ‘इतकी’ रक्कम

अंकिता लोखंडे आणि विकी जैन ठरली ‘स्मार्ट जोडी’, चमचमणारी ट्रॉफी आणि बक्षीस म्हणून मिळाली ‘इतकी’ रक्कम

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘स्मार्ट जोडी ‘चा महाअंतिम भाग नुकताच समोर आला असून विजेतेपदाची नावेही समोर आली आहेत. लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (vicky Jain) या टीव्ही जोडीने हा शो जिंकला आहे. शो जिंकल्यानंतर दोघांनाही चमचमणारी ट्रॉफी आणि बक्षीस म्हणून २५ लाख रुपये मिळाले. दुसरीकडे बलराज सियाल आणि त्यांची पत्नी दीप्ती तुली यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी तिसऱ्या स्थानावर आहेत.

ट्रॉफी जिंकल्याबद्दल उत्साहित असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणाली की ,“स्मार्ट जोडीचा किताब जिंकून मला खूप आनंद झाला आहे. ही उत्साह, आनंद आणि अस्वस्थता या मिश्रित भावना आहे. माझा पती विकीच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आम्ही एक होतो आणि एकत्र खेळलो. आम्हाला ट्रॉफी जिंकण्याची गरज होती, कारण हा विश्वास आहे जो आमच्या नात्यात खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमचे नाते आणखी घट्ट झाले. आम्ही एकमेकांना भेट देऊ शकलो असतो तो 4 महिन्यांचा सर्वात चांगला वाढदिवस होता. आमचे कुटुंब खूप आनंदी आहे आणि आम्ही हा विजय पूर्ण उत्साहात साजरा करू,”

दुसरीकडे, विकी जैनने आपल्या विजयाबद्दल बोलताना “स्मार्ट जोडी हा एक साहसी प्रवास आहे. आम्ही एक जोडी म्हणून किती पुढे आलो आहोत हे मी पाहू शकतो. आमच्या उल्लेखनीय प्रवासात या स्मार्ट जोडप्यामुळे आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकलो आहोत. हे खूप आश्चर्यकारक आहे. आमच्या चाहत्यांनी त्यांच्या अतूट प्रेमाने आणि पाठिंब्याने आम्हाला किती मदत केली. माझ्यासाठी आणि अंकितासाठी हा प्रेमाचा विजय आहे आणि या शोमधून आम्हाला मिळालेले धडे आम्हाला दीर्घ आणि आनंदी मार्गावर घेऊन जातील. त्यामुळे ही ट्रॉफी जिंकल्याने आमच्या नात्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.” असे मत व्यक्त केले आहे.

दरम्याम स्मार्ट जोडी हा शो फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला होता, ज्यामध्ये 10 सेलिब्रिटी जोडप्यांचा समावेश होता. या शोमध्ये अंकिता-विकी, अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, बलराज-दीप्ती, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, मोनालिसा-विक्रांत आणि भाग्यश्री-हिमालय दासानी ही जोडी एकत्र दिसली होती. शोमध्ये या सर्व कपल्सची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

हे देखील वाचा