मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून स्मिता गोंदकर ओळखली जाते. स्मिताने तिच्या बोल्ड लूकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘पप्पी दे पारूला’ हे गाणे जेवढे हिट झाले तेवढे या गाण्यात दिसणारी अभिनेत्री आणि तिच्या बोल्ड अदा गाजल्या. एका गाण्यातून स्मिता गोंदकर स्टार झाली. यानंतर बिग बॉसमधून तर तिने अमाप लोकप्रियता आणि फॅन फॉलोविंग मिळवली. आज स्मिता गोंदकर नाव समोर आले की डोळ्यासमोर तिचा बोल्ड अवतार येतो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या स्मिताने नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला आहे.
स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि बोल्ड लूकमुळे गाजत असते. काही दिवसांपूर्वीच तिने पठण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरील वादावर तिचे मत मांडत एक विधान केले होते, जे खूपच चर्चेत राहिले. सध्या स्मिता तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडियावर तिचा एक बिकिनी फोटो पोस्ट केला असून, हा फोटो आणि त्याचे कॅप्शन सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे.
View this post on Instagram
स्मिता सध्या व्हॅकेशन मूडमध्ये आहे. ती थांबलेल्या एका हॉटेलमधला एक फोटो स्मिताने पोस्ट केला आहे. हा तिचा एक बिकिनी फोटो असून यात तिने काळ्या रंगाची बिकिनी, डोळ्यांवर गॉगल, कानात फुल असा लूक केला असून, तिचा हा फोटो फॅन्सला चांगलाच आवडत आहे. फोटो पोस्ट करताना तिने तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा हॉटेलचा कर्मचारी परफेक्ट फोटो काढतो.”
मुंबईचा डब्बेवाला सिनेमातून पदार्पण केलेल्या स्मिताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने काही मालिका आणि हिंदी शो देखील केले. मात्र तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी ‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने आणि बिग बॉस ने मिळवून दिली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट