Monday, February 24, 2025
Home मराठी स्मिता तांबेच्या घरात होणार चिमुकल्या पाहुण्याची एंट्री! डोहाळेजेवणाचा व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने दिली गोड बातमी

स्मिता तांबेच्या घरात होणार चिमुकल्या पाहुण्याची एंट्री! डोहाळेजेवणाचा व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने दिली गोड बातमी

या वर्षी चंदेरी दुनियेतून अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. काहींच्या घरात सनई चौघडे वाजले आहेत. तर काहीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याची एंट्री झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे हिने देखील चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे स्मिता लवकरच आई होणार आहे. स्मिता तांबेच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

स्मिता तांबेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मिताला तिच्या मैत्रिणी डोहाळे जेवणासाठी तयार करताना दिसत आहेत. तसेच तिला सगळे दागिने घालताना दिसत आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ती यामध्ये खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहे. तिच्या सगळ्या मैत्रिणी ‘कोणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर डान्स करत आहेत. (Smita tambe share a baby shower video on social media and give good news to her fans)

स्मिताने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या क्षणी जेव्हा तुमच्या मैत्रिणी अचानक तुमच्या घरी सरप्राइज द्यायला येतात. खूप मस्ती आणि खूप खूप प्रेम फुलवा, रेशू ताई, आदिती, अमृता.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच सगळेजण तिचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेत्री स्मिता तांबे हिने २०१९ मध्ये नाट्य कलाकार वीरेंद्र द्विवेदीसोबत लग्न केले आहे. त्यांनी महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन पद्धतीने हे लग्न केले होते. ती अनेकवेळा तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘बायेस्कोप’, ‘गणवेश’, ‘ट्रकभर स्वप्न’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘रुख’, ‘देऊळ’, ‘परतू’ यांसारख्या अनेक हिट सिनेमा दिले आहेत. या व्यतिरिक्त स्मिताने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत डॅशिंग मम्मीची भूमिका साकारुन सगळ्या चाहत्यांची मनं जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा