स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाली की, “‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) मध्ये परत येणं माझ्यासाठी खास आहे. या मालिकेमुळे माझं आयुष्यच बदललं, आणि ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच या शोची आठवण आणि त्याची परंपरा जपणं मला खूप महत्त्वाचं वाटतं.”
एकता कपूरचा फेमस शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा येतोय, आणि यावेळी दुसऱ्या सीझनमध्ये! तब्बल 25 वर्षांनी स्मृती इराणी परत ‘तुलसी विरानी’ च्या भूमिकेत दिसणार आहे. यावर स्मृतीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, हा शो माझ्या आयुष्यात खूप खास होता, त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं.
स्मृती इराणी एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाली, “काही गोष्टी परत येतात, पण फक्त जुन्या आठवणींसाठी नाही, तर एका खास कारणासाठी. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये परत येणं म्हणजे फक्त तुलसीच्या भूमिकेत परतणं नाही, तर त्या कथेत परत जाणं आहे. जी गोष्ट होती, जिच्यामुळे भारतीय टीव्ही बदलला आणि माझं आयुष्यही बदललं.”
स्मृती इराणी पुढे म्हणाली, “या शोने मला केवळ प्रसिद्धी किंवा यश नाही दिलं, तर त्याहून खूप जास्त दिलं. या मालिकेमुळे मी लाखो घरांशी जोडले गेले, लोकांच्या भावना आणि त्यांच्या आयुष्याचा भाग बनले. गेल्या २५ वर्षांत मी मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन वेगवेगळ्या जगात काम केलं. दोघांची ताकद वेगळी असते आणि जबाबदारीही वेगळी असते. आज मी अशा टप्प्यावर आहे जिथं माझा अनुभव भावना आणि विश्वासाशी एकत्र येतो, आणि माझी कला आणखी ठाम होते.”
“क्योंकि सास भी कभी बहू थी 2″मध्ये परतण्याबद्दल स्मृती इराणी म्हणाल्या, “मी फक्त अभिनेत्री म्हणूनच परतलेली नाहीये, तर एक अशी व्यक्ती म्हणून परतलेय जिला वाटतं की, कथा सांगणं ही एक ताकद आहे, ज्यामुळं समाजात बदल घडू शकतो. आपली संस्कृती जपणं आणि लोकांमध्ये समजूत व सहानुभूती निर्माण करणं महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. या मालिकेच्या नव्या भागात काम करून, मी ‘क्योंकि सास भी…’ या मालिकेच्या परंपरेचा सन्मान करू इच्छिते आणि अशा भविष्याला आकार द्यायचा आहे जिथं आपल्या देशातल्या क्रिएटिव्ह लोकांना खरी मान्यता आणि ताकद मिळावी.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा