स्मृती इराणी (Smriti Irani) आता ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेत दिसणार आहेत.ते बघून एका चाहत्याने त्यांना विचारलं, “तुम्ही राजकारणातून ब्रेक घेतलात का?” यावर स्मृतिताईनी मजेशीरपणे उत्तर दिलं.
स्मृती इराणी लवकरच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेत परत येणार आहेत. या मालिकेचं शूटिंग सुरू झालंय. ते बघून काही फॅन्सनी विचारलं, “तुम्ही राजकारणातून ब्रेक घेतलाय का?” यावर स्मृतिताई म्हणाल्या,“असं काही नाही बरं का,मी अजूनही राजकारणातच आहे!” एका फॅनने कमेंट केली होती,“स्मृतिताई,तुम्ही परत टीव्हीवर येताय,खूप खूप अभिनंदन! आशा करतो की हे फक्त थोड्यावेळाचं ब्रेक असेल राजकारणातून”. यावर स्मृतिताईंनी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
स्मृतिताईंनी X (ट्विटर) वर लिहिलं,“मी अजिबात कुठलाही ब्रेक घेतलेला नाही. गेले २५ वर्षं मी मीडिया आणि राजकारण दोन्हीत काम करतेय. मंत्री म्हणून जबाबदाऱ्या होत्या म्हणून थोडं थांबावं लागलं, पण माझ्या पक्षाच्या जबाबदाऱ्या मी कधीही सोडल्या नाहीत,आणि पुढेही सोडणार नाही.” एका युजरने कमेंट केली,”तुमचं टीव्हीवर परतणं खूप छान वाटलं. मी आणि माझ्यासारखे अनेक फॅन्स तुम्हाला पुन्हा राजकारणातही सक्रिय बघायला उत्सुक आहोत, खास करून बंगाल आणि यूपीच्या निवडणुकांमध्ये. माझी आई तर शोबद्दल ऐकून खूपच खुश झाली.”
यावर स्मृती ताईंनी प्रेमळ उत्तर दिलं,”तुमच्या आईला माझा नमस्कार! निवडणुकीत पक्ष जे काही काम देईल, त्यात मी पूर्णपणे सहभागी होईन,याची खात्री बाळगा”. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर स्मृती इराणी यांचा पहिला लूक आता समोर आलाय. प्राेमाेमध्ये त्या मॅरून रंगाच्या साडीत दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या पुन्हा एकदा ‘तुलसी’च्या भूमिकेतच दिसणार आहेत. फॅन्स त्यांना परत टीव्हीवर पाहायला खूपच उत्सुक आहेत. या मालिकेत अमर उपाध्यायदेखील झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली अर्चना पुरण सिंग; दुबईच्या व्लॉग मध्ये सांगितली सगळी माहिती…