Saturday, July 6, 2024

अभिनेता आविष्कार दार्वेकरचे दुसरे नव्हेतर तिसरे लग्न, दुसऱ्या पत्नीने केले धक्कादायक आरोप

अभिनेता आविष्कार दार्वेकर बिगबॉस सीझन ३ पासून चांगलाच चर्चेत आला होता. या कार्यक्रमात त्याने अनेक कारणांमुळे प्रेक्षकांमध्ये त्याच्या नावाची चर्चा झाली होती. या कार्यक्रमात आविष्कारची घटस्फोटित पत्नी स्नेहा वाघनेही सहभाग घेतला होता. त्यामुळेच त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अभिनेता आविष्कार दार्वेकरने दुसरे लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. मात्र अभिनेत्याचे हे दुसरे नव्हेतर तिसरे लग्न असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी अभिनेता आविष्कार दार्वेकरने नुकतेच दुसरे लग्न केल्याची माहिती समोर आली होती. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला होता. मात्र आता आविष्कार दार्वेकरचे हे दुसरे नसून तिसरे लग्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीने याबाबतची पोस्ट करत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

स्मिता सावंत असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नमस्कार, मी अवनी. आविष्कारची पत्नी. आम्हाला पाच वर्षाचा मुलगा असून त्याने ठरवून मला फसवले आहे. आमचा घटस्फोट झालेला नसताना त्याने ठरवून तिसरे लग्न केले आहे. त्या मुलीच्या घरीही मी जाऊन आले. मात्र त्यांनी गुपचूप घरातंच लग्नं लावून दिले आहे.

इतकंच नाही तर आविष्कारनं त्याच्या दुसऱ्या पत्नीला आर्थिकदृष्ट्या फसवलं असल्याचा आरोप देखील तिनं केला आहे.यामध्ये ‘ त्याने आणि याच्या घरच्यांनी मला पूर्णपणे आर्शिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे सगळे दागिने विकले. माझ्या नावावर खूप कर्ज करुन ठेवलेत. माझे माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्यानं मला सांगितलं कोर्टात जाऊन माग त्याच्या घरी गेले तेव्हा मला हाता पाया पडायला लावलं. तरच पैसे देईन म्हणाला. त्या मुलीला विचारलं असता ती मलाच उटल बोलायला लागली मारायला धावून आली’. या प्रकरणाची सध्या सिने जगतात जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –

देशभर स्वातंत्र्यदिनाचा जल्लोश, पण ‘या’ अभिनेत्यांनी बदलला नाही डिपी

‘या’ एका कारणासाठी अभिनेते धर्मेंद्र चुकवायचे सीन, शोले चित्रपटातला रंजक किस्सा ऐकून व्हाल थक्क

अभिनेत्री कंगना रणौतने पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने; म्हणाली, ‘हा माणुस…’

 

हे देखील वाचा