कोरियन ड्रामा ‘स्नोड्रॉप’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली अभिनेत्री किम मी शूबद्दल (Kim Mi Soo) धक्कादायक बातमी समोर आली आहे. किम मी शूचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले आहे. ती आता या जगात राहिली नाही. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.
किम मी शूच्या मृत्यूने चाहत्यांना बसला धक्का
या अभिनेत्रीने ५ जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. किम मी शूच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. किम मी शूवर तानेयुंग सुंगसिम फ्युनरल होम येथे अंत्यसंस्कार केले जातील. अभिनेत्रीच्या मृत्यूने तिचे कुटुंब पुर्णपणे तुटले आहे.
She's one of my fave characters from Snowdrop..????
Rest in Peace, Actress Kim Mi Soo.???????? You will always have a special place in our hearts. pic.twitter.com/BpSrgqmWVq— ????✨ (@pau_blinkue) January 5, 2022
किम मी शूच्या आकस्मिक निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीची एजन्सी लँडस्केप एंटरटेनमेंटने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. निवेदनात लिहिले आहे की, “आम्ही अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक बातमी देत आहोत. किम मी शूचे ५ जानेवारी रोजी अचानक निधन झाले. अचानक आलेली ही दु:खद बातमी समजल्यानंतर अभिनेत्रीचे कुटुंबीय तुटले आहेत.”
#KimMiSoo ????????
RIP TO THE BEAUTIFUL SOUL ????????#RestInPeace#Snowdrop pic.twitter.com/xPioAq5f1B— Ash⁷???????? (@Ash_with_love_) January 5, 2022
अभिनेत्रीच्या कुटुंबाला हवी आहे प्रायव्हसी
“आम्ही कोणत्याही प्रकारच्या अटकळ आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो. जेणेकरून शॉकमध्ये विलीन झालेले कुटुंब शांतपणे मृत व्यक्तीची आठवण ठेवू शकेल. अभिनेत्रीचे अंतिम संस्कार गुप्त ठेवावेत, अशी कुटुंबाची इच्छा आहे. किम मी शूच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करा.”
one of jeong min's powerful lines.. rest in peace kim mi soo :(( pic.twitter.com/MPShIeETcs
— ???? (@jennieski) January 5, 2022
No…. This news break my heart.
Rest In Peace Kim Mi Soo#KimMisoo pic.twitter.com/Wb0iceAKJr— DyonBosch (@DyonBosch) January 5, 2022
Room 207 will never be the same without Kim Mi Soo (Yeo Jeongmin).
One of Jeong min's powerful lines. Rest in peace unnie! ???????? pic.twitter.com/OOTVgEwT2P— rodgeee_ (@rogelyn_jarlega) January 5, 2022
‘स्नोड्रॉप’साठी मिळाले प्रेम
किम मी शूने ‘स्नोड्रॉप’ या मालिकेत येओ जंग मिनची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीची भूमिका चांगलीच पसंत केली गेली होती. ही सीरिज अजूनही ऑन एअर आहे. किम मी शूने अनेक ड्रामा शोमध्ये काम केले होते. ‘हेलबाउंड’, ‘हाय बाय मामा’, ‘द स्कूल नर्स फाइल्स’, ‘युमीज सेल’ यांचा समावेश आहे.
हेही वाचा :