Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

बॉलिवूडमध्ये दिलकश अदा, टाईमलेस ब्यूटीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा त्यांच्या सौंदर्याच्या बाबतीत आजही टॉपच्या अभिनेत्रींना मागे सोडतात. त्यांचं सौंदर्य, त्यांचा अभिनय, त्यांच्यातली विनम्रता यामुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. रेखा यांच्या आयुष्यातही सिनेमांप्रमाणे अनेक ट्विस्ट्स आणि टर्न आलेत. मंडळी आज आपण रेखा यांच्या आयुष्यातील असेच काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.

रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड यश मिळवले. दोन्ही कलाकारांनी आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यादरम्यान, अमिताभ आणि रेखा यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. एक काळ असा होता, जेव्हा हे दोन्ही कलाकार प्रचंड चर्चेत होते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. ते दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, असेही सांगितले जाते होते.

रेखा त्यांच्या बिनधास्त पणामुळे ओळखल्या जातात. त्यांना जे आवडते, ते त्या नेहमीच करतात. त्यांना परिणामांची अजिबात पर्वा नसते. एकदा तर त्या मंगळसूत्र आणि सिंदूर लावून ‌ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाला गेल्या होत्या. त्या काळात अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा झाली. रेखाला मंगळसूत्र घातलेले पाहून सर्वांना वाटले की, त्यांनी अमिताभ बच्चनशी लग्न केले आहे.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे लग्न आर. के. स्टुडिओमध्ये पार पडले. त्या काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांच्या लग्नाला उपस्थित होती. दरम्यान, रेखा समारंभात आल्या आणि त्यांनी गळ्यात मंगळसूत्र घातले होते, तर कपाळावर थोडे सिंदूर लावले होते. ते पाहून सर्वांचे लक्ष रेखा यांच्यावर केंद्रीत झाले. ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोग्राफीत सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. मात्र, बऱ्याच काळानंतर रेखा यांनी मौन तोडले आणि म्हणाल्या, “त्या काळात मी शूटिंगमधून थेट लग्नाला पोहोचली होती. लोक याबद्दल काय म्हणतील या गोष्टीची मला अजिबात पर्वा नाही.”

रेखा यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्यात ‘खूबसुरत’, ‘सिलसिला’, ‘बसेरा’, ‘नमक हराम’, ‘दो अनजाने’, ‘बीवी हो तो ऐसी’, ‘राम बलराम’, ‘संसार’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा