Sunday, April 12, 2026
Home अन्य सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या अथर्व सुदामे बांधली लगीन गाठ

सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या अथर्व सुदामे बांधली लगीन गाठ

सोशल मीडियावरील सेन्सेशन आणि डिजिटल कन्टेन्ट क्रियेटर असणाऱ्या अथर्व सुदामेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी त्याने पुण्यात त्याची मैत्रीण असलेल्या निशींसोबत लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. आजच्या काळात सोशल मीडियावर कोणी नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे अथर्व हे नाव कोणालाच नवीन नाही. इंस्टाग्रामवर येणाऱ्या सर्वच रिल्समध्ये अथर्व नक्कीच दिसतो. विनोदी, सामाजिक, माहितीपर अशा विविध रिल्समधून तो सध्याची असणारी वस्तुस्थिती हटके मार्गाने दाखवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

अथर्वला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग असून, त्याचे रिल्स आणि व्हिडिओ नेहमीच टॉपवर असतात आणि व्हायरल होतात. अथर्व सोशल मीडिया सेन्सेशन असण्यासोबतच एक उत्तम अभिनेता, गायक आणि विनोदवीर देखील आहे. अनेक गायनाच्या कार्यक्रमांमध्ये तो दिसत असतो. अथर्व त्याचे स्वतःचे व्हिडिओ बनवण्यासोबतच अनेकदा यूटुबवरील प्रसिद्ध अशा भाडीपाच्या व्हिडिओंमध्ये विविध सिरीजमध्ये देखील दिसत असतो.

काही दिवसांपूर्वीच त्याची ‘9 टू 5’ ही सिरीज प्रदर्शित झाली होती आणि तुफान गाजली देखील. अथर्वने आतापर्यंत त्याच्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, सुनंदन लेले, पार्थ भालेराव ही त्यातलीच काही नव्हे. याशिवाय त्याने झी मराठीवरील झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२२ या शोचे रेड कार्पेटवर सूत्रसंचालन देखील केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ने काश्मीरमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम, सिनेमाने मोडला ३२ वर्षांचा दुष्काळ
नीना गुप्ता यांच्या मुलीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर फोट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा