परिणीती चोप्राला इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे पूर्ण! अमिताभ बच्चन अन् अनुपम खेरसोबत केक कापताना दिसली अभिनेत्री


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या चित्रपट कारकिर्दीत तिने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण केली आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या आगामी ‘उंचाई’ चित्रपटाच्या सेटवरील या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

सेटवर तिच्या सहकलाकारांनी आणि टीम क्रूने तिला या खास प्रसंगी सरप्राईज दिले. मुंबईतील मेहबूब स्टुडिओचा व्हिडिओ शेअर करताना परिणीतीने लिहिले की, “आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट सरप्राईज. ‘उंचाई’च्या संपूर्ण टीमने माझा दिवस खूप खास बनवला. जर मला अशा महान दिग्गजांसह सेलिब्रेट करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली तर मी काहीतरी योग्य केले असेल. १० वर्षे आणि मी नुकतीच सुरुवात केली आहे.” (social media parineeti chopra completes her 10 years in the industry)

परिणीती पुढे म्हणाली, “माझ्याकडून टीमला आणि कुटुंबाला खूप प्रेम आहे, ज्यांच्याशिवाय मी काही नाही. नेहा, अजयजी, मायकल, मंजू, गोविंद, संजय आणि YRF च्या टीमने व्यस्त वेळापत्रकातही मला स्पेशल फील करवून दिले. माझ्या चाहत्यांशिवाय मी काहीच नाही. मला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद.”

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सेटवर सिल्व्हर रंगाच्या फुग्यांवर ‘परिणीती चोप्राचे १० वर्षे’ लिहिलेले दिसत आहेत. यानंतर परिणीती सेटवर एन्ट्री घेते. सेटवरची सजावट पाहून ती चकित होते. यानंतर ती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनुपम खेर (Anupam Kher), बोमन इराणी (Boman Irani) यांच्यासह चित्रपटातील इतर सदस्यांसोबत केक कापताना दिसली. त्याचवेळी, तिचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) या व्हिडिओवर कमेंट केली की, “वय झालंय आता.”

अभिनेत्री परिणीती चोप्राने २०११ मध्ये रणवीर सिंगसोबत ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्री ‘इशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘संदीप और पिंकी फरार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!